या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. २०६ कसा आहे प्रसादाचा तडाका? आणि कशी आहे अपारभावी व परिपूर्ण लीला ? नाहीतर घांसले वामनांनी आणि मोरोपंतांनी खर्डे ! 'सूख' 'अंगिं' 'मीटे' 'अभीमान' 'कसी' असले अमोघ शब्द त्यांच्या वंशांत तरी आढळले होते का कधी ? 'महंतीभराने' अहा! काय आहे लज्जत ? तसेच देहभागी' ही केवढी प्रसादवाणी ! आतां आमचे कित्येक वाचक आझांस ह्मणतील 'कोकिळ' निखालस काकडष्टि आहे. असतील नसतील ते चटसारे दोष गोळा करून त्यांची आंतडी ओढीत बसतो. 'भुजंगप्रयात' वृत्ताचे श्लोक केलेले आहेत, त्यावर नजरचुकीने पडले असेल 'इंद्रवज्रा' हे नांव! त्याचा येवढी उद्गार चिन्हें एकापुढे एक तीन घालून 'पराचा कावळा' करण्यांत अर्थ कोणता? पण महाराज! तसल्या चुका टिपीत बसणारा हा 'कोकिळ' नव्हे. आपल्या ह्या पांखरावर ग्रंथकांची डोळ्यांत तेल घालून सांजसकाळ मेहरबानी असते बरें. कारण, ह्या गरिब पांखरावर न जाणों कोणी असले नसते आक्षेप घेतील ह्मणून ते आधीच त्याच्या भक्कम पुराव्याची तजवीज करून ठेवितात. ह्याच 'स्फूर्तीत' पहाना ? पुढे एक सुदामचरित्र आहे. त्यांतील 'इंद्रवज्रा' वृत्त ऐकाना बापडें: तं वस्त्र अंगी तनू रोड झाली ॥ नसे पोटतप्ती क्षुधा आंत जाळी ॥ मुल लेकर संतती फार होती॥ परी संपत्ती (!!) नाहीं हो त्यांत शांती॥१॥ अस ती फार सूशील जाती ॥ दरिद्रामधी तोषवी जी पती ती ॥ नस निंद्य वाणी सदां हास्यमूखी ॥ पती कष्टतां होतसे फार दुःखी ॥२॥ प ह्या पद्यांवर काय काय व किती किती झणून टीका करावी ? उडदामध्ये गौपणा, आणि उंटामध्ये सरळपणा सांपडणे जितकें संभवनीय, तितकेंच ह्यांत शुद्ध सापडणे संभवनीय आहे. 'आमचा बैल काय बैल झणजे बैल आहे ! माकणी आणावयाला लागले झणजे मात्र बसतो. बाकी औताला तसाच; नांगराला तसाच, मोटेला तसाच! ह्या ह्मणीप्रमाणे ह्या पद्यांत छंदोभंग तेवढा जाडा आहे; बाकी समासाची रचना तशीच; अशुद्धांची रेलचेल तशीच वाक्यांची जुळणी तशीच; हवा तो देव मागा, गारोड्याच्या पोतडीप्रमाणे ह्यांतून पटकर काढून देता येईल. खरोखर ह्यांना 'अनंतसागर' ह्मणण्यापेक्षा 'अशुद्धसागर' असें नांव दिले, तर तें मात्र अगदी यथायोग्य होऊन मोठा सन्मान केल्याचे श्रेय येईल. 'पोटतृप्ती' आहाहा! काय पण समास ? पण जे 'अनंत' स्वरूपी बनले त्यांना शब्दसंयोगांत उंच नीच येवढा जातिभेद कशाला पाहिजे? 'संपत्ती नाही हो-ह्या शब्दांवर तर 'इंद्राचें 'वज्र' पडल्या