या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ केरळकोकिळ, पुस्तक १५ वे. मुळे, त्यांच्या तर ठिकऱ्याच उसळल्या! 'हास्यमूखीची' 'सूशील जाती' पाहिल्यावर हासू येणार नाही येवढे गंभीर राजेश्री आहेत कोण ? आणखी 'इंद्रवज्रा'चा मासला:बरा विप्र हा जेधवां द्वारकेसी । असे पातला त्या दिनी याजपाशीं । बहू फाटका वीतरुंदीच पंचा । दुबोटी चिंदी (!!) डोईला मान ईचा॥ बरी बांधुनी गांठुडी पैरव्याची। हरीने घरी ठेविली गौप्य साची ॥ बहू दीन झालें चलावें त्वरेनें । मुलें माणसें वाट पाती मनानें ॥ २ ॥ 'अशुद्धसागरा' मध्ये असले किती तरी खंदक पडलेले आहेत. मग एकाबद्दल काही मोठेसें कौतुक मानावयास नको! 'दुबोटी चिंदी' ने व्याकरणाचे धुडके उडविले, छंदाच्या ठिकऱ्या केल्या तरी कोणी तिचा अव्हेर करता कामा नये. कारण तो साक्षात् श्रीकृष्णाच्या सख्ख्या मित्रासारख्याचा प्रसाद आहे ! 'गांठुडी' 'पैरव्याची' 'दीन झालें!' 'वाट पाती झणजे पहातात !" इत्यादि शब्दांवरून लिंबलोण उतरावें तितकें थोडेंच! कारण ती वाणी 'प्रत्यक्ष परमात्म्याने लेखन केलेली आहे. आतां 'प्रेमरंगां'त न शिरतां निजभक्ती'तील एकच श्लोक देतो आदी अनादी जगदेकराया । वाढे स्वभावो समता कराया ॥ माया जगाला मृगभास वाटे । अज्ञान ज्ञानें नच जाय वाटे ॥१॥ 'आदी' शब्द दीर्घ लिहिणे, स्वभावाला' हे पितरांचे रूप देणे आणि 'अज्ञान ज्ञाना'ने छंदावर कुठार घालणे इत्यादि नमुना ध्यानात ठेवण्यासारखा नाही असें कोण ह्मणेल? असो. इंद्राचे वज्रघात सहन करून आमची मंडळी आतां बरीच थकली असेल. ह्याकरितां त्यांस आतां आझी 'नवविध' गोपीतील 'शिखरिणी' छंदांतील शिखरिणीची मेजवानी देतो. तिचाही आमच्या वाचकांनी प्रेमाने रसास्वाद ग्रहण करावा: गुणाईशा देवा गणपति मला फार मति दे। भवातें नाशाया कलिमल हरी बुद्धि बरि दे नाका ति (!) दे गा तूं विद्या जि (तिची सख्खी बहीण!!) उचित मनां मोहन करी। करी शांती चित्तां गुण गितिं मती घोळिवि बरी ॥ १ ॥ अहाहा! कशी आहे शिखरिणीची गोडी ? आणि कसा आहे तिच्यांतील खमंग मसाला ? 'गुणा-ईशा'! किती सुलक्षण समास ? केवढी ही वैय्याकरणां/तील प्राविण्यता ? 'मति' शब्द दोन वेळ आला आहे. पण बिशाद नाहीं की,