या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २८५ वरील उतान्यावरून जसे इतिहाससमुद्राचे अनंतत्व दिसून येते, तसाच ग्रंथकाराचा त्या विषयावरील व्यासंगही दृष्टिगोचर होतो. अशांच्या हातून उत्कृष्ट ग्रंथ निपजावा, ह्यांत नवल ते काय ? असो. आता हा प्रस्ताव पुरे करून प्रस्तुत ग्रंथांत मुख्य मुख्य गुण कोणते, व दोष कोणते, ह्या प्रधान विषयाकडेच वळू. _ कोणताही विषय संगतवार दुसऱ्याच्या मनांत बिंबवून देण्याला, त्याचे यथावत् विभाग पाडतां येणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. आणि इतिहासासारख्या व्यापक व भानगडीच्या विषयांत तर तें फारच कठीण. तथापि सांगण्यास मोठा संतोष वाटतो की, रावसाहेब सरदेसाई ह्यांस तें कौशल्य बिनमोल साधलें आहे. त्यांनी प्रस्तुत विषयाचे विभाग इतक्या ठाकठिकीने केले आहेत की, तेवढ्यावरून सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेची तारिफ केल्यावांचून कोणी राहणार नाही. प्राचीन इतिहासाचा भाग त्यांनी सोडून दिला आहे; व अर्वाचीन इतिहासांत (१) 'मुसलमानी रियासत' (२) 'मराठी रियासत' आणि (३) ब्रिटिश रियासत, असे तीन भाग करून त्यांपैकी प्रस्तुत ग्रंथ पहिला भाग जो 'मुसलमानी रियासत' तो प्रसिद्ध केला आहे. व पुढील दोन भागही असेच प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रस्तुत भागांतील विषयरचना कशी केली आहे, हे वाचकांस समजणे अत्यंत इष्ट वाटल्यावरून तिचे थोडेसें दिग्दर्शन करतो. । ही 'रियासत' मुसलमानांचीच असल्यामुळे, प्रथमतः महंमद पैगंबरापासून त्यांची पूर्वपीठिका दिली आहे. त्याच्या मागून झालेले खलिपा इत्यादिकांची थोडक्यात माहिती देऊन अखेर हसेन हुसेन ह्यांचे मृत्यु व त्यांचे हिंदुस्थानांत ताबुतरूपाने राहिलेले स्मारक ह्याची उत्पत्ति, येथपर्यंत एक प्रकरण संपविलें आहे. तिसऱ्या प्रकरणांत मुसलमानांचा हिंदुस्थानाकडे रोंख कसा फिरला त्याची कारणे दिली आहेत. त्यानंतर गज्नी, घोरी, गुलाम, खिलजी, तघ्लख , इत्यादि घराणी व वंश ह्यांचे प्रत्येक कारकीर्दीवार वर्णन आहे. ह्यानंतर तैमूरलंगाची स्वारी. इतके झाल्यावर गतकालाचें पर्यालोचन केले आहे. ह्यापुढें गुजराथेशी व रजपूतसंस्थानाशी संबंध आला, ह्मणून त्याही प्रत्येक घराण्याचे थोडक्यांत परंतु सुंदर वर्णन केले आहे. ब्राह्मणी राज्य, निजामशाही, आदिलशाही, कु. तुबशाही ह्यांची वर्णने ह्यापुढे आहेत. हे झाल्यावर मोंगल घराण्यांतील प्रत्येक बादशहाची कारकीर्द सविस्तर नमूद केली आहे. ह्यांत बाबरबादशहापासून तों तहत दिल्लीचा शेवटचा नामधारी बादशहा बाहदुरशहा हा सन १८५७ च्या