या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तंबर १९०१. २०७ एकमेकांची एकमेकांस ओळख असेल ? एकदां -हस्व तर दुसऱ्यांदा दीर्घ! 'ति' आणि 'जि' ह्या सख्या-नव्हे, जुळ्या बहिणी नव्हेत असे कोण ह्मणेल ? 'गिति' 'घोळिवि', काय, एकाहून एक चढ! आतां थोडासा 'मालिनी' छंद:नमन करुनि एका नाथपायी कथेला । मतिन रुपपसारा गोपती गोपबाला ॥ वदनि रवसुधाही बाळलीला मिषाने । पसरिन जग कानी घेउं देतें सुखाने ॥ १ वद तु वदनि जिव्हे वेळ कांगे करीसी। सटसट तष झाडी शारदे ब्रह्मवासी ॥ नमुनि सति पुढे हो या हरी शामरंगा। मति धृति गुण ऊठे तोचि बोलू सुरंगां ॥२॥ अवसर दिन होतां काळसूकाळ काळीं। उदयसमय बोधां आरसा हा सकाळीं॥ मुलसमिप बसोनी रीजवी माय ते हो । तदिं तिन वरुषांचा कानु हा बोबडा हो मनसिंदळ घरतिचा तो चोर पोरांमधीं हो । बिदिं गलिं फिरतोगे गोरसां नागवा हो तळतळ ति तमासे पाहुनी गौळणी त्या। झगमग गडणीया सांगुं येती कळी त्या आह्मी आजपर्यंत अनेक ग्रंथांतील अनेक दोष दाखवित आलों खरे. पण ह्या 'अनंतसागरां'त बुडीद सुद्धा लागत नाही, मग ठाव कोठचा ? पहिल्याच दोन चरणांचा अर्थ किती मजेचा आहे पहा ! + अन्वय-"एका नाथपायीं नमन करुनि, गोपति गोपबाला कथेला, (व) रुपपसारा मतिन"!! अहाहा! केवढी ही प्रसादवाणी? पण 'आत्यंतिक प्रळयातील लिहिणे, असेंच असते. आतां अर्थः-एकनाथांच्याच पायाला नमस्कार करून, गोप आणि गोपाळ यांच्या कथेला आणि रुप-पसारा-रूपाचा अर्थात् ब्रह्मस्वरूपाचा पसारा-झणजे विस्तार मतिन'-[मथीन की काय?] कथन करीन. पण 'पपसारा' 'मतन' करतां करतां विद्रूप पसारा मात्र छान रंगारूपास आला आहे ! 'ब्रह्मवासी' शारदा ती कसली? 'ऊठे' हे रूप तर काय पांचवीस पुजलल, त्याबद्दल प्रश्नच नाही. 'मुलसमिप बसोनी रीजवी' किती शुद्ध, किती नियमसूद, व किती मनोल्हादक वाक्य हे ? तदि तिन वरुषांचा' हे त्याचेच भावंड. दीर्घाचे -हस्व, व -हस्वाचे दीर्घ करण्याचे तर व्रतच उचललेले आहे, 'मनसिंदळ' 'घरतिचा' [गरतीचा] ही तर काय कोंदणांत बसविलेली शब्दरत्नें! 'बिदिं' आणि 'गलिं'-झणजे गल्लीत-[मात्र कवीपेक्षां अर्थ लावणारा हुषार व जरा चणचणीत पाहिजे.] 'बिदि' ह्मणजे काय ? आणि 'गलिं' ह्मणजे काय ? बिदी झणजे गल्ली नव्हे काय ? (कृष्णाचे) तमासे पाहनी तळतळति !! आणि त्या झगमग गडणीया 'कळी' 'सांगुं येती' इतके विवरण करण्याचा 'इतरांना अधिकार नाही.' खरेच.