या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. आतां आमच्या वाचकांस काय पाहिजे ? कोणत्या छंदाची आवड आहे ? हवा तो सांगावा. भीड धरण्याचे प्रयोजन नाही. चंपकमाला, रथोद्धता, शार्दूल, कामदा, पाहिजे तें मागावें. 'अनंतस्फूर्ति'मध्ये कमी तें काय असणार? कदाचित् छंद नच सांपडला, तर त्याचे नांव तरी असावयाचेच. त्याला तर 'अभाव' ह्मणजे 'अदर्शन' नाहींना? मग काय ? बोला आतां काय चामर ? हे घ्याःREET काय गे तुझा मुला जरा भिती नसे दिसे। मा पोर तीन ते बरोबरी हरी सिमा असे ॥ RT H RE वाणसी मधी पती बरोबरी सुखामधीं। काम येवढ्या मधी रवी दुपारं वास दे दधी॥३॥ROPERIFIENT सात्विका मती पया निती विचार ते दधीं। शोधनी रसांतुनी वरा नवां निती निधी हारवावया भवां तरा (!) बरी दिसे हिची। कानिं घ्या भरोनिया रिती दुजी नवीरुची ॥ १२ ॥ फोडली ग (!!) गाडगी दुधामधीं दधी मिळे । लोणि त्यांतुनी बरा हरी सुखी त्वरें गिळे ॥ कालवी भुमीवरी पडे मुतेच त्यामधीं। राज आयिके न गे मला खराबि थोर यामधीं ॥ ११॥ "तुझा मुला'! काय पण खुमास ? बाकी काही असो, परंतु ह्या 'प्रत्यक्ष परमात्म्याने आपल्या अनंत काव्यांतील 'अपारभावी' लीलेंत सामान्यरूपाचा चुकून सुद्धा कोठे व्रतभंग केलेला नाही. ही तरी ह्या अवतारांतील मोठी सुदैवाची गोष्ट होय. नाहीतर कृष्णावताराप्रमाणे प्रतिज्ञाभंग करूं लावणारा कोणी एखादा भीष्माचार्य भेटला असता तर करतां काय ? 'भिती' 'मती' 'निती' 'कानि' 'दधी' 'लोणी' "भुमीवरी' हे तर 'श्रीमदनंतांचे सनदे नोकरच आहेत. 'वाणसी'-झणजे वर्णन करतोस. तरा-झणजे त-हा. आणि 'खराबि' शब्दाबद्दल लिहावे तितकें थोडेच होणार. 'गिळे' क्रियापदाबद्दल 'दादोबा पांडुरंगांनी सुद्धा हात टेकले! हे सर्व असो. पण वृत्ताला पाद किती? चार ना ? आणि चार पाय असले की ते चतुष्पाद-जनावर-होय. तेव्हां इतका हलका प्राणी छंदास बनवावा हे 'परमात्म्यास' कसें बरें आवडणार ? कारण छंद कसलाही असला, तरी तें सरस्वतीचे अपत्य नव्हे काय ? ह्याकरितां त्यास द्विपाद बनविले आहे. पुढी/ पद्य पहा: