या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० केरळकोकिळ, पुस्तक १६वे. त्यांत फारसें नवल नाही. आणि 'प्रत्यक्ष परमात्म्याला' हां नव्हे हां ह्मणणार तरी कोण ? 'अहंपणापती' तरी तेवढा ठेवणीसाठी ह्मणून बासनांत बांधून ठेवण्याविषयी वाचकांस आमची सूचना आहे. आतां 'कीर्तनविधी' च्या 'चंपकमाले'तील एक दोन पुष्पें: बोलत तेव्हां फारचि जिव्हा । आलि पुढे ती चंचळ रीती | DNA सआइ ग खोटा हा मुल (!) मोठा । यास तु बाई ना भय काई ॥१॥ तेव्हां जिव्हा फारच बोलू लागली! आणि ती चंचळ रीती पुढे आली ? आइग! हा मुल मोठा खोटा! बाई यास तुं ! काई भय नाही! आधीं अर्थांचा कोठे पत्ता लागावयाचा नाही, आणि लागला तर तो असा !! आणखी एक: यां भवनाशां दुःखविनाशां । सारसुरेशां ठावहि शेषां ॥ गोकुळ । भ्रष्टे कामिनि कष्टे । गोरसिं तुष्टे ऊरत उष्टें ॥ २ ॥ कशी आहे अनंत अनुस्वारांची अनंत गर्दी! आणि शिवाय यमकें! काय ! पण आतां शार्दूळाचा झोंक व यमकचातुर्य तर पहा. हा आत्मनिवेदनविधि आहे बरें: बाळाला शिकवी बरा गुण तुंगे कारा मिटी यां अजिं । सारा गोंधळ घालि तो हरि तुझा बाराकळी काळजि ॥ चाळा फार बरा नगे दिसत हा सांभाळ आतां सुत । आनंदास अनंत मीळत तदां गोपालरूपीं सत ॥ २॥ हस्वदीर्घाविषयीं तर पुनरुच्चारण करण्याचे प्रयोजन नाहीच. कारण किती ह्मणून करणार ? 'परमात्म्याची' अशुद्धेच काढावयाला लागले, तर बिचारा सहस्रफणींचा शेष सुद्धां घामाघूम होऊन जाईल! आतां कित्येक चोखाळ वाचक शेवटच्या चरणाचा अर्थ काय ह्मणून पृच्छा करतील, किंवा 'गोपालरूपी सत' ला हांसतील. पण तसे करण्याचे बिलकुल कारण नाही. कारण तें बोलून चालून 'अक्कडकडवें'च आहे. आणि यमकांचे कौशल्य तरी किती? पण थांबा. पुढचा श्लोक तर ऐका. नाही तर सारें हासें पहिल्याच श्लोकाला संपेल, आणि पुढील श्लोकाला विन्मुख दवडण्याची पाळी येईल. त्या पद्यरत्नाची ठेवण अशी: पाहूनी ति गरोदरी सति तिला पूसे असें आइक । कां गे थोर बहू दिसें उदर हे ढोलासरी माफक ॥ बोधाने सुनिती गमे हृदयिं ती शांतीरुपां साजत। आनंदास अनंत मीळत तदां गोपाळरूपी सत ॥ ६ ॥