या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. अनंत 'लीलावी' सद्गुरु श्रीकृष्णाची बाललीला वर्णन करतात. ति गरोदरी [अहाहा! किती सुंदर आणि अपारभावी शब्द हे ! गरोदरापासून झालेली ती गरोदरी ] सति, तिला आइक असें पूसे. [ काय ? तर हे ढोलासरी-हणजे ढोलाप्रमाणे-आणि माफक [तें काय ? ] उदर बहू थोर कां गे दिसे? [ ह्यावरून गुरुमहाराज तात्पर्य काढतात.] बोधाच्या योगाने हृदयामध्ये सुनिती वाढते. [ आणि ती] शांतिस्वरूपाला शोभते. [शांतरूप कोणाचें ?] आमच्या अक्कलहुषारीने तीन चरणांचा अर्थ आह्मीं जेमतेम ओढून काढला. पण शेवटच्या अक्कडकडव्याला पहातांच आमचे बुद्धिशस्त्र बोथट होऊन जाते. उपाय नाही. असो. पुढें: चामरवृत्त किती बिचारें साधे ? एक अक्षर -हस्व व एक अक्षर दीर्घ असले की झाले. परंतु एकाच चरणांत किती यतिभंग आहेत ते पहा: प्रेमभाव । ब्रह्मराव देहनांव । द्वारका ॥ देहाचें नांव द्वारका! हा नवा शोध! आतां सुदामदेवांच्या स्नानाचा मासला: वसंततिलका. ऐशा रितीं सकळ त्या हरिचा सुदारा। भेटोनि वंदिति बहू सद त्या उदारा ॥ममा स्नानास नीर मग तें बहु आणियेलें । घंगाळ रत्नखचिती मधिं ओतियेलें ॥ ८४ ॥ "अशा रीतीने त्या हरीचा (च्या नव्हे) सुदारा-उत्तमोत्तम स्त्रिया त्या उदाराला भेटून बहू वंदिति. पद 'सद' तें काय! ती 'अपारभावी लीला'! मग स्नानास तें नीर-पाणी-बहू-खूपसें आणविले. आणि मग 'रत्नखचितीं घंगाळ' (त्या) मधि ओतलें !" जगामध्ये 'घंगाळां'त पाणी ओतण्याची रीत आहे. पण येथे मात्र श्रीकृष्णांनी अद्भुत चमत्कार केला. तो काय? तर पाण्यांत 'घंगाळ' ओतलें ! कारण अनंतामध्ये सर्वच भाव विपरीत पडला! त्याच्याच खालचा आणखी एक श्लोक “गुणा न ह्मणतां उणा अधिक आदरें सेविती' या न्यायाने संग्रहीं असावा. तो हाःगंगोदकें भरुनिया घट हेमपात्रै । स्वासीक चंदन बरें निळरामपात्रे ॥ तेले सुवासिक बरी दवणा गुलाबी। जी काढलीं निजमसींतुनि थेंबथेंबी८५ निळरामपात्रे' हणजे काय ? काय तरी लोकांना उठाठेव ? भलत्याच गो