या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. ष्टीची चौकशी करित बसतात! 'निजमुसींतुनि' 'थेंबथेंबीं' काढलेली सुवासिक तेलें हातावर चोळून भपकारा सोडीत बसावें ह्मणजे झाले. आतां शार्दूळ: आले बोल सखोल नीगमचवी गोडी असे फार रे । बोधाचे सडकेवरोनि चलतां दृष्टी बरें येत रे ॥ जासी हींमत फार ती अभिमती त्यातें नसे ही चवी । TO भावीकांप्रति संभवे सदमती भ्रांति सरे जां भवीं ॥ १३८ ॥ ह्यांत 'प्रत्यक्ष 'नीगमचवी'च गोड असल्याने व सदगती'च मिळण्याचा संभव असल्यामुळे, व्याकरण, प्रयोग, इत्यादि हवीं ती अशुद्ध दृष्टीस पडतात ! तासे ढोल तुते बरी चवघडे सिंगें तुतारे बहू। घंटा झंगट झाज ताल करते वीणे सतारी जहू ॥ कोणी गात ॥ स्वतोषता नवविधी भक्तीरुपे छंद ते । कोणी नाचक कौतुकें करुनिया तालासनीं मानते ॥ १८४ ॥ यंत्रांचे बडिमार फार उडती उल्लाट यंत्रे तसीं।। जाती बाण नभांतरी झटुनिया कामामदाची घसी ॥ आले द्वारसमीप राजसदना तेव्हां प्रिया पातली । जातीची सुशिलामती पतिधती राखीत चित्तीं भली ॥ १८५ ॥ वीधीचा जनिता असे पुरविता तेथें नसे न्यूनता । कांता शांतमता अशा स्वरुपिं हो कांतास आनंदतां ॥ तेव्हां ब्राह्मण मानसामधिं बहू लज्जावतासारिखा । नेत्रांचा पडदा जडोनि बसला पाहे तदां नासिकां ॥ १८८॥ आली आरति घेउनी चमकते जैसी नभी वीज ते । आले सर्वहि भाव ते हरिकृ अंगी बरे आयते ॥ लाजोनी बसली पुढें घुडत ती शोधान्वयें सज्जनीं । बुद्धी आत्मसबोधनी बरवि गा जेवीं रवी बोधनीं ॥ १८६ ॥ 'घुडत' झणजे-शोभत–ही टीप ! आतां एक 'मंदाकाता: हा गा देवा जळत हृदयीं भारि माझ्या उदारा । कां गा आजू-न नच मजला पाहसी हे उदारा ॥ [यमकें अक्षरें आली तर त्यांचे अर्थ दोन चरणांत दोन निराळे व्हावे ला गतात. हे 'परमात्म्याच्या' गांवीं असणार कोठून ? ]