या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. २१३ रंगो गा ही मति तव गुणी हे रमेचा पती रे। तोडी बंधांतुनि भवपुरी देइं शांती सुखा रे ॥१॥ खालील 'मानिनीवृत्ता'चा श्लोक 'भवोझें नाश करणारा असल्यामुळे, प्रत्येक संसारिकाने त्याचा नित्यपाठ केलाच पाहिजे. सकळगुणइशा गा दातया एकदंता । गणपति मति दे तूं दुःखहारी महंता ॥ भजनपुजन नेणें कोटि अन्याय माझे । पदर पसरितों मी पोटिं घालीं भवोझें ॥१ 'सकळगुणइश' तरी बरें, 'श' द्वित्त घातला नाही हे तरी उपकारच. पण घातला असता तरी काय ? 'मुळरुप' व्यक्त झाले असते! गणपतीच्या पोटिं 'भवोझें' कोंबून भरल्यानंतर सरस्वतीची प्रार्थना:नमिन मि जि कुमारी वाग्वरी शारदा ती । वसनधवल अंगी या जगी रंगली ती॥ मनिं भर गित माझा आननीं नाच तूं गे। झडकरि वद ते गे गोडि रंगे असो गे १ साक्षात् परमात्म्याने, साक्षात् 'वाग्वरी'ची केलेली प्रार्थना! मग काय विचारावी तिची 'गोडि'! केवळ मिठीच बसते ! श्लोकाश्लोकांचाच वाचकांना कंटाळा येईल-ह्याकरितां दोनतीन दिंड्या: देवभेटी फार ती दूर आहे । भले गेले शोधितां तयां पाहे ॥ हट्टयोगें तो हरी नाहिं भेटे । उगां त्रासा सोसिसी दुःख वाटे॥१॥ बरें ऐकें सांगतों रीत ती रे । धरी ध्यानीं पूरती कान दीरे ॥ जया नाहीं रूप तें गूण पाही । निराकारी वास जा सत्य पाही ॥२ वेद जाला वर्णितां सीणले ते । सदां शास्त्र भांडती आपमत्तें ॥ नसे शब्दां ठाव तो वाच्यवाचे । भूतांठायीं गूण ते दृश्य साचे ॥ ३ अहाहा! केवढा प्रसाद हा! 'देवभेटी' 'नाही भेटे' 'पूरती' कान दीरे। 'जाला' 'भूताठायीं' आणि 'आपमत्ते' हा सर्वांचा मेरुमणी !! काय हा वेदांत व केवढा हा ज्ञानाचा लोंढा ? आतां कांही सवाया पाहिजे असतील ना ? ध्या; 'रंगलूटी' मध्ये काही कमी नाही: नरहरि केशव माधव यादव अच्युत वामन शाम होत उग्गवहान पयोबुधिवासक गोपिपयोधर गोपनि सखकर संगति सज्जनमानसहस मुरारि रमापतिमा अभय तुझा कर पामरिं या धर शांति मनामधिं या भर गा ॥ २६ मदसुदना तुजवांचनिया मजला जाग गा न च कोण बरें। झडकरि धांव स्वभाविक मायसिं संकट नीरसि आजि बरें ॥