या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. कमलसुलोचन हास्मित आनन भाल विशाल सुशामल तें । मजप्रति दाखिव मानस तोषक स्वानुभवामृत गा पुरतें ॥ २७ तनु ठकली विटली उठली तुटली घडि ही अजिं आगमिची । निजगतिलक्षण लक्षित मुद्रित आत्मचराचर ऐक्य तुंची ॥ प्रिति न रुची जगतीं दूसरी तनुची असुची जडली पदि ती। मममन भाव ॥ स्वभाव तुं जाणसि काय वर्दू अजिं गा पुढती ॥ २८ ॥ बस्सू आतां 'हास्मित आनना'च्या सवया पुरेत. आमचे वाचक ह्या सोंवळ्याला बहुतेक कंटाळले असतील. ह्याकरितां आता रंगेल रसिकांकरतां 'लावणी' ची पर काढतों: मनिंच जागिती आगि दूसरी हाले न मान प्रेतचि जाण कुसडि (!) घाण स्वासन न प्राण पेटत अंतरीं ॥ धरुनिया करी ऊचली हरी मनमोहन वृत्तिदोहन खेळे जोबन (!!) वारिजलोचन घे मांडिवरी ॥ मुखजि पूसलें पीतपालवी नाहीं वीट वृत्ति धीट मुखदीठ [दृष्टि ही टीप.] फिरवी मीठ (तें काय ?) बहुत लाघवी ॥ उघडि नेत्र हो तेधवां बरी येक ॥ध्रु० ह्यावर अधिक चर्चा ती काय करावयाची ? आतां मानसपूजाविधि 'वसंत तिलका' छंद:पीता जगा जगतिचा जडा अंतरा रे। तूझी लिला न वदवे दिनवत्सलारे॥ कांता तुझी उदधिजा पदभागिं दासी । कैसा पुजू तुज मि गा न सुचे मनासी १ आहे दिनामधिं जमा धनहीन देवा । वीधी कसा सम घडे मज वासुदेवा ॥ देवा तुझा भजनिं गा विधि हात जोडी । तेथें नरा तुज रूपी धन केंवि जोडी२ आतां आसन विधिः-स्रग्धरा वृत्तः-- विष्णूपत्नी भुदेवी अजि मम मनीं आसनी साह्य व्हावें । भूतें जी का पुजेला समकुळ नसती येथुनी दूर व्हावें ॥ शांती व्हावी मनाला मिपणमति ती कल्पना नास मातें आये तूवां अनादी स्थुळनिजजनि ते इच्छिलें सिद्धि न्हे ॥१ आतां 'शिखाबंधन'; वृत्त तेंच:-- देवी तूं ऊर्ध्वमूले जगनगरूपें पालके वीरुपाक्षे। आहारार्थे तुला गे प्रितिकर जननी मांसशोणीतभक्षे॥ तुष्टे देवी शिखा ॥ बंधि सदगति सुदी शुद्धिही बुद्धी देई । देतो ग्रंथी तुला ही विरगुठि समते दुष्ट नाशार्थ येई ॥१॥