या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. २१६ ह्यांतील प्रत्येक शब्द विचार करण्यासारखा आहे. 'भक्षे' चा संबंध लावावयाचा तरी कोणीकडे ? 'सदगति'! 'सुदी'-ह्मणजे [ शुद्धि ] ही टीप ! पण 'विरगुठी' ते काय ? ह्याबद्दल बुद्धि चालत नाही. आतां अभिषेक,वसंततिलका:वेडुर्य माणिक निलमुक्त सुपुष्कराजा । रत्नादिकी नवखणी असुरी भभूजा॥ आणीयले अभिषकां मग प्राथुनीया। केली दया मजवरी तम झाडि काया॥१ ह्यांतील अर्थ, हेतु, रचना, इतकेच नव्हे तर प्रत्येक गोष्ट 'परमात्म्यालाच' काय ती माहित! आता वाचकांसही कंटाळा आला असेल. कारण आमच्या हाताला सुद्धा तो आला. ह्याकरितां आतां एकच शार्दळविक्रीडित श्लोकानें 'हस्तप्रक्षालण' विधि करून हे प्रकरण पुरे करूं. तृप्तीला करणार जो जगतिला तो भावयोगें हरी। जेवीला मम हस्तकें कवतुकें आनंद झाला उरी ।। स्वामीचे कर धूतले मुखहि तें उष्णोदकें स्वासिकें । पाणी पूसुनि पालवी करचिरें आणीयले कौतुकें ॥ १ ॥ असो. 'अनंतस्फूर्ति' 'छापद्वारें' बाहेर आल्यामुळे, व ती वाचण्याचा आह्मी 'उद्योग्य' केल्यामुळे व 'निगमवाणी' फारच 'मनोहर' व 'सर्वविलासपरिपूर्ण' व 'अनंतलीला अवर्णनीय' असल्यामुळे हे 'कोकिळन्यायाचें? 'लीलावी' 'प्रत्यक्ष परमात्म्याने लेखन केलेलें हें कवित्व पाहून व ऐकून 'सर्व आत्मरचना या भावाने थोर थोर समाधान' पावतील, हा वेदोक्त आशिर्वाद सफल होईल या आशेवर येवढ्या 'अपारभावी' महासागरांतील बरीच रत्ने काढून ती, वाचकरूपी रत्नपरीक्षकांपुढे ठेविली आहेत. त्यावरून ह्यांत छंदाला ठिकाण नाही; यतीची डाळ शिजत नाही; हस्व दीर्घरूही विपरीत भाव ठेवल्यावांचून कधीच तोंड दाखवित नाहीत. तोंडास येईल तो शब्द आणि मनांत येईल तो अर्थ. अशी 'प्रत्यक्ष परमात्म्याने येथे सरस्वतीशी केवळ झोटिंग बादशाही केली आहे. तात्पर्य ही 'अनंतनाथस्फूर्ति' हणजे आजच्या विसाव्या शतकांतील कवित्वस्फूर्तीचा, रसिकाग्रणींच्या मार्मिकतेचा, व भोळ्या भावाचा एक अस्सल नमुना आहे. संतांची ओळख संतांवाचून नाही' येवढ्याच तत्त्वावर केवळ सत्पुरुषाच्या तोंडची वाक्ये झणजे महाप्रसाद होय, इतकी ज्यांची दृढतर श्रद्धा असेल, त्यांनी ही स्फूर्ति खुशाल संग्रह करावी, किंवा तिचा नित्य