या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. पाठ करावा. त्याबद्दल आमचें कांहींच झणणें नाही. पण कवित्वगुण या दृष्टीने पाहिले तर असलें गाबाळग्रंथी चोपडे अशा चिकित्सक कालांत जगापुढे मांडून व त्याची विक्री सुरू करून 'श्रीमदनंतसद्गुरु' भक्तांनी त्या सत्पुरुषांची विनाकारण विटंबना मात्र केली, दुसरे काही नाही, कवित्व आणि साधुत्व हे गुण निखालस निरनिराळे आहेत. साधुत्व असले की, कवित्वाने असलेच पाहिजे असा नेम नाही. 'श्रीमदनंत' ह्यांच्या अंगी साधुत्वाचे गुण असतील, आमचें ना ह्मणणे नाही. परंतु कवित्वाचा गुण मात्र तादृश नव्हता. तोंडांतून 'बडा बडा' पाहिजे ती अक्षरे काढल्याने काही काव्ये बनत नाहीत, ह्मणूनच तुकारामांनी झटले आहे "कविल हे नव्हे टांकसाळी नाणे". ते साधु असल्याने भोळसर स्वभावाचेही असू शकतील. त्यांनी आपल्या स्वत:च्या करमणुकीसाठी कशाही वेड्यावांकड्या कविता केल्या असतील. पण त्या प्रस्तुत मन्वंतरांत कोणत्या कसोटीला उतरतील हे मास्तर, पोष्टमास्तर, वकील अशासारख्या गृहस्थांस कळू नये, किंवा कळले असून त्यांनी त्या तशाच्या तशाच वेड्या विद्या स्वरूपाने "छापद्वारें" बाहेर का. ढाव्यात ही अत्यंत शोचनीय व तशीच आश्चर्यकारक गोष्ट होय. आणि त्यावर सांगतात की 'हे प्रत्यक्ष परमात्म्याने लेखन केले आहे ! बिचारा परमात्मा । जपर्यंत 'अकर्ता' असून ह्या भक्तमंडळीने त्याला खर्डे घांसावयास लावावेंना ? आणि त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे त्या 'प्रत्यक्ष परमात्म्यानेच' ह्या कविता केलेल्या असतील, तर त्या 'अपार लीलावी' परमात्मस्वरूपास आमची अशी सविनय सूचना आहे की, पुन्हा जर आमच्या ह्या हतभागी महाराष्ट्र देशावर असा कवितारूपाने अनुग्रह करण्याचा प्रसंग आला, तर त्याने प्रथमतः एखाद्या खेडेगांवांतील शाळेत आपले नांव घालून, मराठी सहाव्या यत्तेत उत्तीर्ण व्हावें, किंवा निदान चवथी यत्ता तरी शिकून वृत्तदर्पण, व्याकरण, शुद्धलेखन व भाषाज्ञान येवढे विषय अवगत करून मग तरी हातांत कलम धरावें. विनाकारण, सरस्वतीदेवीची विटंबना करून आपले व आपल्या भक्तांचें नांव दूषित करून घेऊ नये. येवढी हात जोडून विनंति करणे इष्ट दिसते. नाही ह्मणावयाला ह्या ग्रंथाची छपाई निर्णयसागरची असल्यामुळे व बाइंडिंग हीं उत्कृष्ट असल्यामुळे बाह्यांग फार मनोहर झाले आहे. येवढे सांगून फार निराशेनें कलम खाली ठेवतो. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJË, DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.