या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. बंडांत सामील झाल्यामुळे इंग्रजांनी दिल्ली घेतली, व त्याच्या पुत्रांस व नातवांस ठार मारून बहादुरशहास ब्रह्मदेशांत काळ्या पाण्यावर पाठविले, आणि दिल्लीतील मोंगल वंशाचा मागमूसही ठेवला नाही, येथपर्यंत पल्ला पोंचवून हा भाग समाप्त केला आहे. ह्यांत आलेल्या राजघराण्यांची परंपरा एकदम ध्यानांत यावी, ह्मणून ह्यापुढे सुमारे ५० पाने जोडून प्रत्येक राजघराण्याचा वंशवृक्ष दिला आहे, व त्यापुढे ह्या भागांत आलेला प्रत्येक पुरुष, स्त्री, शहर, धर्म, गोष्ट, किल्ला, वस्तु-जसें मुल्क-इ-मैदान नांवाची तोफ-इत्यादिकांचे वर्णन ताबडतोब सांपडण्यासाठी १४ पानांचा वर्णानुक्रम कोशही जोडला आहे. प्रत्यक कारकीर्दीतील पोटविभागही असेच सुव्यस्थित आहेत. प्रथमतः राज्यारोहणपद्धति, नंतर बंडावे वगैरे, राज्याची व्यवस्था, त्याच्या कुलगोताचे वर्णन, सभोंवारची स्थिति, स्वारीचा थाटमाट, अंतकाल, व शेवटी त्याच्या वर्तणुकीवर परकीयांची व आपली मते अशा त-हेचा क्रम धरलेला आहे. येवढ्यावरून आह्मीं पूर्वी वर्णन केलेला संगति लावण्याचा जो ग्रंथकाराचा प्रधान गुण त्याची साक्ष पटण्यास काही नड नाही. आता दुसरा गुण हणज वर्णन करण्याची हातोटी हा होय. वाचकांची मनें तल्लीन करणारा, दुसऱ्या विषयावर आपले वर्चस्व स्थापन करणारा, नीरसत्वाला सरसत्व देणारा गुण हाच, ह्याबद्दल राव० सरदेसाई ह्यांची जितकी झणून आह्मी तारिफ करूं तितकी खचितच थोडी होईल. पंद्याने व शुष्क वृक्षांनी भरलेल्या इतिहासरूप परड्याचा सरदेसाई ह्यांनी मनोरम बाग बनविला ह्यांत तिळमात्र संदेह नाही. ह्यांत गजबरलेल्या फलपुष्पांचे काय काय झणून वर्णन करावें ? नानाप्रकारच्या मधुराम्लरसांनी थबथबलेलीं व नेत्रयुगुलांस आपल्या मनोरम वर्णांनी गारीगार कर. णारी फलें ह्यांत ओथंबली आहेत; चित्रविचित्र रंगांनी, व अंत:करणांस प्रसन्न करणाऱ्या परोपरीच्या सुगंधांनी आल्हाद उत्पन्न करणारी पुष्पं ह्यांत विकसित झाली आहेत; तप्त अंतःकरणास निवविणारे अनेक घनदाट वृक्ष आपल्या शाखा पसरून शीतल छाया व मंद वायु देण्यास ह्यांत तत्पर होऊन उभे राहिले आहेत; निर्मल जलांनी व प्रफुल्ल कमलांनी सुशोभित सरोवरे ह्यांत तुडुंबली आहेत; कर, महाभयंकर, हिंस्र पशूची पेंढा भरलेली कलेवरें येथे सांठवून ठेवलेली आहेत, झणजे 'निरो' बादशहाच्या राजवाड्याप्रमाणे, ह्या मुसलमानी रियासत' रूपी बागेत कोणताही नमुना नाही असे नाही. नवरसांचा समुद्र तर एका भागांतील एका कोपऱ्यांत सुद्धां सांपडेल ! झणजे सदरहू "रियासत' हे एक