या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. | पु० १५] [अं०१० लोकोत्तर चमत्कार. पोटांत दगड असणारा पक्षी. डोडो. finा "सर्वाश्चर्यमयं नम:"-हणजे आकाश हे साऱ्या आश्चयोनींच भरलेले आहे. हे वाक्य आपणांस आपल्या पुराणांतरी आढळते. आणि त्यावरून आपल्या पूर्वजांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जारीने केला होता, किंवा त्या विषयाकडे त्यांचे चित्त वेधले होते, असें दिसून येते. पण त्यांनी ज्योतिषशास्त्राचे जितकें सूक्ष्म अवलोकन केले होते, तितकेंच जर प्राणिशास्त्राचे अवलोकन केलेले असते, तर त्यांनी प्राणिशास्त्रही असेच अनंत आश्चर्यानी भरलेले आहे, असे नमूद केले असते ह्यांत शंका नाही. परमेश्वराने निर्माण केलेल्या ह्या अनंतब्रह्मांडांत आश्चर्य हें नाहीं कोठे? असे कोणते स्थल आहे, असा कोणता पदार्थ आहे, व असा कोणता विषय आहे, की ज्या