या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. मध्ये त्या ब्रह्मांडनायकानें आश्चर्य भरून ठेवलेलें नाहीं ? आकाश घ्या; ग्रह ध्या; चंद्र घ्या; सूर्य ध्या; पृथ्वी घ्या; प्राणी घ्या; पंचमहाभूतें ध्या; की प्रत्यक्ष आपला देह घ्या. आश्चर्य हे सर्वांत सारखे अगदी कांठोकाठ भरलेले आहे. सूक्ष्म अवलोकन करणारा मात्र पाहिजे. फार तर काय, पण मृत्तिकेचा एक रजःकण; वाळूचा एक खडा; पाण्याचा किंवा दुधाचा एक थेंब; किंवा रक्ताचा एक बिंदू जरी घेतला, तरी सुद्धा त्यांत सारे लोकोत्तर चमत्कारच भरलेले दृष्टीस पडतात. हे सूक्ष्मदर्शक यंत्रावरून सिद्ध आहे. मग प्रत्येक प्राणिमात्रांत काहींना काहीतरी चमत्कार असतील ह्यांत नवल ते कोणते? शिवाय, ह्या प्राणिकोटींच्या संबंधानें एक विशेष चमत्कार ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. तो चमत्कार हा की, कित्येक अद्भुतगुणविशिष्ट प्राणी, प्राचीन काली ह्या पृथ्वीवर विपुल होते. आणि सांप्रत त्या प्राण्यांचे ह्या जगावर अस्तित्त्व सुद्धां उरलेले नाही. उदाहरण, मेमोथ, प्लेशासरस वगैरे प्राणी होत. हे प्राणी हल्ली जगावर कोठेच दृष्टीस पडत नाहीत. फक्त त्यांचे सांगाडे, किंवा शरिराचा बनलेला पाषाणगड भाग-ज्यास इंग्रजीमध्ये 'फासिल' असें ह्मणतात तो-किंवा बर्फाने युगानयुगे आच्छादून राहिल्यामुळे, न कुजतां, व न नासतां जशीच्या तशीच राहिलेली त्यांची शरीरें सांपडतात, येवढ्यावरून त्यांचे अस्तित्व असल्याची साक्ष पटते इतकेंच. आणि त्यावरून असें अनुमान करतां येते की, ज्याच्या शरिराचा अवशिष्ट भाग, कोठेच राहिलेला नाही, किंवा आढळलेला नाही, किंवा ज्यांचा भूगर्भात सुद्धा आतां मागमोस उरलेला नाही, असे शेकडो प्राणी पूर्वी असले पाहिजेत. पक्ष्यांच्या संबंधाने आणखी एक विशेष गोष्ट आहे, ती ही की, त्यांच्या बहुतेक जातींत एक एक लोकोत्तर किंवा विशिष्टगुण आढळतो. वर चित्र दिलेला डोडो हा पक्षी अशांपैकी एक आहे. ह्मणजे त्याचे आतां ह्या जगावर अस्तित्व नाही. आणि तें होते तेव्हां त्याच्या पोटांत एक प्रकारचे दगड निघत असत! ह्याकरितां त्याची थोडीशी माहिती देतो. साखरेच्या पुरवठ्यावरून मोरेशेस बेट आपल्यांतील बहुतेकांच्या परिचयांतीलच झालेले आहे. ते डोडो ह्या प्रचंड पक्ष्याचे वसतिस्थान