या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २१९ होते. थोड्या वर्षांपूर्वी ते तेथें विपुल दृष्टीस पडत. परंतु चमत्कार हा की, हे पक्षी पृथ्वीच्या पाठीवरील इतर कोणत्याही देशांत कोणाच्याच कोठे पहाण्यांत आलेले नाहीत. प्राणिशास्त्रांना ह्या पक्ष्याचा प्रथम शोध ह्याच बेटांत लागला. आणि त्या कालीं ह्या पक्ष्याचा त्या बेटांत इतका सुळसुळाट असल्याचे लिहिले आहे की, पुसू नये. प. रंतु सांप्रत ती जात, तेथे सुद्धा अगदीं नाहींशी झाली आहे. पुष्कळ वर्षापासून तेथे हा पक्षी बियास सुद्धां उरला नाही. त्याची ती लवचिक व रेशमासारखी मृदु चामडी कोठेच उपलब्ध नाही. ह्या पक्ष्याचे कांही अवयव मात्र साक्षीला परमेश्वराने ठेवले आहेत हेच मोठे उपकार समजावेत. उदाहरणार्थ:-मस्तक आणि जबड्याचा काही भाग येवढी मात्र लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये पहावयास मिळतात. ह्याच ठिकाणी त्या सुंदर व लोकविलक्षण पक्ष्याची दोन चित्रेही आहेत. ह्याशिवाय त्या हतभागी द्विपाद प्राण्याचा ह्या भूमंडळावर कांहीं मागमोस सुद्धां उरला नाही. ह्यावरून कालाची गति किती विचित्र ह बरें? मोरिशसबेटांत एका काली हे पक्षी इतके भरलेले होते की, खलाशी लोकांस त्यांची पारध करणे ह्मणजे नित्याची करमणूक असे. पण ही पारध ते लोक त्यांचे मांस खाण्याच्या लालचीने, किंवा त्यांच्या मोल्यवान् व दुर्मिळ चामड्याकरितांच करीत नसत, तर त्या पक्ष्याच्या पोटांत एक प्रकारचे चमत्कारिक व कठीण असे दगड सांपडत त्याकरितां ! ह्या दगडांचा चाकू व वस्तरे लावण्याच्या कामी फारच उपयोग होत असे. ह्मणजे डोडोपक्षी हा उत्तम निष्ण्यांचाच एक खजिना-भांडार-किंवा मायबापच होता मटले तरी चालेल. किती अद्भुत चमत्कार हा ! प्राण्याच्या पोटांत दगड उत्पन्न व्हावेत कसे? व ते रहावेत तरी कसे? तथापि मनुष्याच्या पोटांत मुतखडा होत असलेला जर आपण प्रत्यक्ष पाहतों, तर ह्यांतही विशेषसें नवल वाटावयास नको. मात्र इतकेंच की, मुतखड्यापासून मनुष्यास दुःसह इजा भोगावी लागते, आणि ह्या पक्ष्याच्या आंगांत हे खडे स्वाभाविक असत. डोडोचे घरटे झणजे वाळलेल्या पालापाचोळ्याचा जमिनीवर एक