या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. मोठा थोरला केलेला ढीग असे. ह्या ढिगांत तो आपलें एक शहामृगाच्या आंड्यासारखे प्रचंड आंडे धालित असे. डोडो चांगला मोठा झाला ह्मणजे त्याचे वजन ४० पासून ९० पौंड भरत असे असें मणतात. मनुष्याहून पशुंची थोरवी. श्लोक. ज्ञानी थोर विचारशील ह्मणती लोकांत ह्या मानवा चित्तीं सूक्ष्म करा विचार ह्मणजे सारा दिसे वानवा । कृत्ये तोच कधी कधीं करितसे वेड्या पिशासारखी हा हा श्रेष्ठ खरा पशूच गमतो ह्याहूनि मोठा सुखी ॥१॥ चारा जोंवरि लाभतो वनचरां हिंडोनि रानीवनी पोटें तोंवरि ती यथेच्छ भरिती दावा न हेवा मनीं । पाणी स्वच्छ नदीस जाउनि पिती तंटा बखेडा नसे श्रीमंती गरिबी अशी नच कधी त्यांच्यांत कोठे वसे ॥ २ ॥ लोकांच्या सदनांत जाउनि पशू भिक्षा न मागे कधीं जैसे याचक मानवांत फिरते आहेत लक्षावधी । नाहीं भक्ष्य उपासमारहि पडे थंडीमुळे कांकडे ऐसें जाउनियां कधीं नच पशू कोणाकडेही रडे ॥ ३ ॥ दारित्र्याची पशुवरि कधी येत नाहींच पाळी श्रीमंतीची लजतहि नसे बापुड्याच्या कपाळी । धान्याचाही तिळभरि नसे सांठपा त्यांजपाशीं चोरीचीही कटकट नसे राहिना तो उपाशी ॥ ४ ॥ नाहीं रोखा सनद लिहिणे मांडतो कोण खाती ताजे ताजे मिळवुनि पहा रोजच्या रोज खाती । नाहीं कोर्ट दगदग जिवां नाहि कोणी वकील ठावी नाहीं लटपट कधी फार ते सत्त्वशील ॥५॥