या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २२१ चित्तीं नाहीं कपट कसले द्वेष नाहींच पोटी विश्वासाने परकिय जनां दाविती ते सचोटी । लांचाने जे कधिं न भरती वाउगी साक्ष खोटी स्टांपामध्ये खरचुनि धना घेति ना जे नरोटी ॥६॥ संसाराचा खडतर असा व्याप नाहींच मागे स्वस्त्रीलाही उदरभरणा द्यावयाला न लागे । नाहीं गाद्या मृदुल गिरद्या तेथ कैंचा पलंग खेच्छ क्रीडा रतिविषय जे कायतें एक अंग ॥ ७ ॥ मनुज विषयसौख्या फार आहे अधाशी चिकटुनि मधुमाजी बैसतो जेविं माशी। अवजड बहु कांता गर्भिणी ढेरपोटी रमति तरि तियेशी काय ही बुद्धि खोटी ॥८॥ एका बाजुस लाट उंच उसळे वेगें महासागरी त्यापूर्वी पडतोच खोल खळगा येरीकडे त्यावरी । साम्याने सुखदुःख तेज तमही सर्व स्थळी दाटले तैसें ज्ञान समान सर्वहि घटीं अज्ञानही वाटलें ॥ ९॥ मोठे थोर सुजाण फार शिकले शास्त्रांतही आगळे कृत्ये ते करिती अशी कधिं जणूं आहेत वेडे खुळे । ऐसे प्रत्यय कैक येउनि पहा दृष्टीपुढे नांदती कांही त्यांतिल आज व्यक्त करुनी दावीतसे संप्रती ॥ १० ॥ व्हावें रक्षण शीत उष्णसमयीं देहास आच्छादन वस्त्रांचा उपयोग हाच ह्मणती कोठे कधी वाद न । त्याला रेशिमकांठ ते रुइफुली किंवा पुढे कर्वत भागेना तरि त्यांतही भरजरी हे चैनिचे पर्वत ॥ ११ ॥ जाणों ह्या दुनियेत गोरगरिबां साऱ्या मिळे घोंगडी कोणी ना उघडी हिवें कुडकुडी कोणी न ती बापुडी। वस्त्रे नेसुनि लाल शाल हिरवी हो कोणतें भूषण खादी जाड दिल्यास दीनदुबळ्या लागेल का दूषण ॥ १२ ॥