या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. कोणी घेउनि व्यर्थ हट्ट करिती कोर्टामधे संगर स्वस्त्रीच्या अति हौशिनें चढविती पायीं कुणी लंगर । तोडे गोट सरी ठुशीवरि हिरे मोत्ये किती कोंदिती सोन्याच्या ह्मणुनी बिड्या जडपणा सांगा कसा सांडिती ॥ १३॥ कोणी लंपट होउनी सुत सुता भूमीत ठेवी धन अन्नाला जणुं की महाग असला कोणीच नाहीं जन । कोणीएक बरे हिरे जडवुनी छत्रीस मोठा सजे उष्णाने तळपे न भूवरि जणों कोणी न मेघे भिजे ॥ १४ ॥ कोणी लाउनि बांधितात शिखरें सोन्या रुप्याच्या कड्या जाणों पृथ्विवरील गोरगरिबां आहेत की झोपड्या । कोणी माकड पाळिती हयगजां कुत्रे ससे मांजर जाणों मानव पाळण्यासच नसे ह्या आज पृथ्वीवर ॥ १५ ॥ चैनीने ह्या खचित पडतो देश ओसाड खास शेतें सारी पिकुनि पडतो मानवांना उपास । पृथ्वीमाजी असुनि सगळे होइना एक सोय रोगोत्पत्ती तिळहि नसतां मृत्युची भेट होय ॥ १६ ॥ काटकसर. प्रकरण दुसरे. काटकसरीची संवय. "आत्मसंयमन करावयाला शिकणे हीच काय ती प्रधान गोष्ट आहे." -गटी. "चालत्या कालाकरितां उद्योग करणारी मनुष्ये फार. पुढील कालाकरितां उद्योग करणारी मनुष्ये थोडी. शहाणा असतो तो दोन्ही कालांकरितां उद्योग करतो. तो पुढील कालाचा उद्योग विद्यमान काली करतो, आणि विद्यमान कालचा उद्योग पुढील कालांत करतो." ज-गेसेस ऍट टूथ.