या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २२३ "आत्मसंयमन कसे करावे हे कळणे हीच काय ती सर्व यशःसिद्धींतील गुरुकिल्ली आहे. एकदा का तुह्मी आपण आपल्याला आवरावयाला शिकलांत की विद्वान् झालांत. तुह्मी आत्मसंयमन करतां हे मला सिद्ध करून द्या; ह्मणजे मग मी तुह्मांला विद्वान् असें ह्मणेन. त्याशिवाय इतर साऱ्या विद्या कुचकामी होत." -मिसेस ऑलिफंट. “सारे जग ओरडत असते की, आमचा संरक्षण कर्ता मनुष्य कोठे आहे ? आमाला मनुष्य पाहिजे. पण हा मनुष्य धुंडावयाला काही फार लांब जाणे नको. तो तुमच्या अगदी हातासरशींच आहे. हा मनुष्य ह्मणजे तुझी, मी, आणि आमच्यांतील प्रत्येक असामी! हा मनुष्य आपण कसे होऊं ? एखाद्याला तसे होण्याची इच्छाच नसेल तर, त्याच्या सारखें कठीण कांहीं नाही. आणि कोणाला तसे होण्याची इच्छा असेल तर, त्याच्या सारखे सोपें कांहीं नाही.' -अलेक्झांडर डयूमस. योग्यता आणि सुख ही पुष्कळ लोकांच्या आटोक्यांत असतात. गणि त्यांनी यथायोग्य साधने जमविली, तरच त्यांना त्यांचा खुशाल उपभोग घेतां येतो. ज्या मनुष्यांना मोठमोठा पगार मिळतो, उत्तम प्रकारची मिळकत असते. त्यांना भांडवलवाला होतां येईल. आणि जगाच्या कल्याणांतील व सुधारणेतील उत्तम वांटा मिळविता येईल. पण हे फक्त श्रम, उत्साह, प्रामाणिकपणा, आणि काटकसर ह्यांच्या अभ्यासानेच साध्य होते. कित्येकांना आपल्या वर्गाची स्थिति उन्नत दशेला आणतां येते ती ह्याच कारणांनी. . आजकाल पैशाच्या टंचाईपेक्षां उधळपट्टीनेच लोक फार दुःख भोगीत आहेत. पैसा खर्च कसा करावा हे समजण्यापेक्षा पैसा मिळविण्याचे काम सोपे आहे. मनुष्य संपत्ति ह्मणून जी काही मिळवितो, ती कांही त्याची मिळकत नव्हे. तर खर्च करण्याची आणि शिल्लक टाकण्याची जी पद्धत ती मिळकत होय. एखादा मनुष्य जेव्हां आपल्या खतःच्या व आपल्या कुटुंबाच्या बेगमीस पुरून उरेंसें आपल्या श्रमाने मिळवितो आणि त्यापैकी थोडी तरी शिल्लक बाजूस काढून ठेवतो, तेव्हां तो लोककल्याणाची तत्त्वे हस्तगत करतो ह्यांत शंका नाही. शिल्लक थोडी का असेना, तरी ती त्याला स्वतंत्र करण्याला पुरे होईल.