या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. आजमितीला ज्यास भरभक्कम रोजमुरा मिळतो, त्याला भांडवला. साठी थोडथोडी शिल्लक टाकण्यास कोणतीच हरकत नाही. ती फक्त आत्मनिरोधाची आणि घरांतील काटकसरीची गोष्ट आहे. खरोखर आजमितीला उद्योगशीलांतील जे पुढारी आहेत, त्यांतील बहुतेक लोक वर सांगितलेल्या वर्गातीलच आहेत. निरुद्योग्यापेक्षां उद्योग्यामध्ये जे काय अधिक असतें तें अनुभव आणि चातुर्य ह्यांचा सांठा हे होय. आपण भांडवलाकरितां कांहीं संग्रह करणे किंवा न करणे हे श्रम करणाराच्या हाती आहे. त्याने शिल्लक ठेवली तर, ती उपयुक्त व फायदेशीर कामाकडे लावण्याचे प्रसंग हवे तितके आलेले दृष्टीस पडतील. मिटहर्टसमध्ये मिस्तर काब्डेन आपल्या एका ग्रामस्थाला ह्मणाला, "मी लांकशायरमध्ये असतांना एके दिवशीं एक गिरणी पहावयास गेलो होतो. तेथे काही मंडळीमध्ये त्या गिरणीचा मालकही होता. त्याचे खरें नांव मी येथे सांगत नाही. तर तूर्त त्याला मी मिस्तर स्मिथ असेच ह्मणतों. ह्या गिरणीमध्ये तीन चार हजारांमध्ये काही कमी येणार नाहीत, इतकी मनुष्ये कामावर असून ती आपापल्या कामांत गुंतर होती. आणि एका सोप्यांत ७००माग चालू होते. त्यांतून चाललों असतां आमच्यांतील एक मित्र फार मोकळ्या मनाचा होता. तो त्या मालकाशी अतिशय संघष्टण दाखवून लांकशायरांतील रिवाजाप्रमाणे त्या गिरणीच्या मालकाची पाठ थोपटून ह्मणाला “हे स्मिथसाहेब, पंचवीस वर्षांपूर्वी स्वतः मजूरी करीत असत. त्यांनी हे सारे केवळ उद्योगाने आणि काटकसरीने संपादन केले.” त्यावर मिस्तर स्मिथनें तशाच मोकळ्या मनाने लागलीच उत्तर दिले "छे! हे सारें मी एकट्यानेच नाही मिळविलेलें. मी एका भाग्यवान् मुलीशी लग्न केले होते. तिला भाग्यशाली ह्मणण्याचे कारण, ती रहाटावर सूत कांतून दर आठवड्याला एशिलिंग पेन्स मिळवित असे." वेळाच्या काटकसरीची योग्यता ही पैशाच्या काटकसरीइतकीच आहे. फ्रांकलीनाने झटले आहे "वेळ हे सोने आहे." कोणाला जर पैसा मिळविण्याची इच्छा असेल तर त्याने कालाचा सध्यय केला झणजे मिळेल. पण तो वेळ अनेक चांगल्या व थोर कृत्यांकडे खर्च केला, पाहिजे. तो विद्यार्जनांत, अभ्यासांत, कलाकौशल्यांत, शास्त्रांत आणि