या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २२६ भाषाविषयांत खर्च करता येईल. नियमसूदपणाने कालाची ही काटकसर करता येते. नियमसूदपणा ही एक विविक्षित हेतु तडीस नेण्याची पद्धति आहे. तिच्या योगानें तें साधण्यांत फुकट वेळ खर्च होत नाही. प्रत्येक उद्योगी मनुष्याने नियमसूद व पद्धतशीर असले पाहिजे; व तसेंच घरांतील बायकोनेंही पण असणे जरूर. प्रत्येक वस्तूला यथायोग्य स्थळ पाहिजे. आणि प्रत्येक वस्तु जेथल्या तेथें असली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला कालही पाहिजे आणि ती यथाकाली झाली पाहिजे. काटकसर ही उपयुक्त आहे हे दाखविण्याची गरज नाही. काटकसर करण्याचा अभ्यास करता येईल, ही गोष्ट कोणासही नाकबूल करतां येणार नाही. त्याची हजारों उदाहरणे आपल्या दृष्टीस पडतात. पूर्वी अनेक लोकांनी जे केले आहे, तेंच इतर साऱ्या लोकांसही करता येईल. काटकसर हा गुण कांहीं क्लेशकारक नाही. तर उलट पक्षा, तो आपणांस आलेल्या मनस्वी कंटाळ्यांतून आणि अनेक अपमानांतून मक होण्यास समर्थ करतो. तो आमचे स्वतःचें मन थोडेसें आवरून घरावयाला लावतो खरा; पण उचित भोग असतील ते घेण्यास मनाई करीत नाही. उधळेपणांत व अवाच्यासवा खर्च करण्यांत ज्या सुखास आह्मी आंचवतों, त्या त्या अस्सल सुखांचा आझांस तो पुरवठा करतो. आपणास काटकसर करता येत नाही, असे कोणत्याच मनुष्याने ह्मणतां कामा नये. आठवड्यांतून चार आठ आणे सुद्धां शिल्लक ठेवावयाचें सुचत नाही असेही काही लोक असतात. आठवड्यातून तीन शिलिंग जरी शिलकेंत टाकले तरी, २० वर्षांत २४० पोडांची रक्कम होते. आणि त्यास आणखी १० वर्षे लोटली तर त्याचे व्याज त्यांत मिळवून ४२० पौंड होतात. काही लोक कदाचित् असें ह्मणतील की, इतकी रक्कम आमच्याने शिलकेंत टाकवणार नाही. बरें; दोन दोन शिलिंग; एक एक शिलिंग; किंवा निदान सहा पेन्सांपासूनच शिलकीत टाकण्यास प्रारंभ करावा. कशानेही प्रारंभ करा. पण काही झाले तरी, प्रारंभ केल्यावांचन सोडूं नका. प्रत्येक आठवड्याला सहा पेन्स जरी सेव्हिग ब्याकेमध्ये शिल्लक ठेविले, तरी २० वर्षांत त्यांची ४० पौंड रक्कम होईल. आणि ३० वर्षांत त्याचे