या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. ७० पौंड होतील. इतक्या गोष्टी व्हावयाला आत्मसंयमन आणि काटकसर करण्याची संवय येवढे पाहिजे. काटकसर करण्याला काही मोठेसें धैर्य नको, अचाट बुद्धि नको, किंवा एखादा अद्भुत गुणही पण नको. त्याला फक्त साधारण व्यवहारज्ञान, आणि स्वतःची चैन करण्यामध्ये आत्मसंयमन, येवढी असलीं ह्मणजे बस्स्. त्याला कट्टा निश्चयच पाहिजे असेंही नाही. तर मन आवरण्याचे थोडेसें धैर्य पाहिजे. तिचा आरंभ करणे, हीच तिच्यावरची शक्कल ! जितकी जितकी काटकसरीची संवय अधिक अधिक करावी, तितकी तितकी ती सोपी जाते. वस्तुतः दररोजच्या कामकाजांत उपयोगांत आणलेला सारासार विचार हीच काटकसर होय. तेवढ्यासाठी जो थोडासा जीव मारावा लागतो, त्याची तूट ती लौकरच भरून काढते. आतां असा एक प्रश्न येईल की, ज्या धंदेवाल्या लोकांना पगारच मुळी थोडथोडे आहेत, ज्यांना एक पै राहिली तरी ती सुद्धा त्यांच्या कुटुंबाला लागते, त्यांची व्यांकेंत ठेवण्याइतकी शिल्लक तरी पर काय ? पण ती गोष्ट सिद्धच आहे. कारण, ती अनेक उद्योगी व हात राखून खर्च करणारांनी करून दाखविलेली आहे. ते आपल्या इच्छा आवरून धरून आपली हात राखून ठेवलेली कमाई ब्यांकेमध्ये किंवा दुसऱ्या गरीब लोकांची शिल्लक ठेवण्याच्या दुसऱ्या सोयी असतील तेथें जमा करतात. ह्याप्रमाणे कोणांस करतां आले तर ते सारे आपल्या खऱ्या खऱ्या सौख्यांत किंवा कोणत्याही खऱ्या खऱ्या विषयोपभोगांत व्यत्यय न येऊ देतां साध्या रीतीनेच करतात. तशाच त-हेने सवीनाही करतां येण्यासारखे आहे. - एखाद्या मनुष्याला चांगले वेतन मिळत असून आपल्या स्वतःकरितांच प्रत्येक वस्तूंत त्याचा विनियोग करणे, किंवा त्याच्या मागे कुटुंब असल्यास त्याच्याकरितां आपली सारीच्या सारी मिळकत खर्ची घालून ह्या आठवड्याची त्या आठवड्याला गांठ पडू न देणे, व त्यांतील सुतळीचा तोडा सुद्धा शिलकेंत न टाकणे, हा केवढा बरें आत्मस्वार्थ ? आह्मी जेव्हां ऐकतों की, तो फलाणा फलाणा मनुष्य महिन्याच्या काठी चांगला पगार मिळवित असून मयत झाला, आणि त्याने मागें कांहीं