या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. त्याचा तिला विलक्षण अभिमान होता. जेन ग्रे ही प्रोटेस्टंट धर्माची असून तिला तो अगदी जीव की प्यार होता. मेरी राणीच्या मनांतून जेन ग्रेला जीवदान द्यावें येवढेच नव्हे, तर निखालस मुक्त करावें असें सुद्धा होते. पण तिची एक अट होती की, ग्रेनें मॉटेस्टंट धर्म सोडून रोमनक्याथालिक धर्मात यावे. ह्यासाठी तिने ही सर्वे आश्वासने देऊन एक दोन धर्माध्यक्षांना तिची समजूत घालण्यासाठी लेडी जेन ग्रेकडे पाठविले. परंतु सत्यनिष्ठ; दृढनिश्चयी; अशी जी थोर अंतःकरणाची माणसे असतात, ती अशा थापांस भुलून भलतेच कर्म करण्याला कधीही प्रवृत्त होत नाहीत. सत्यापुढे त्यांना आपला जीव केवळ तृणप्राय वाटतो. एका संस्कृत कवीने झटले आहे. वनेपि सिंहा मृगमांसभक्षिणो बुभुक्षिता नैव तृणे चरंति । एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीचकर्माणि समाचरंति ॥१॥ "वनातील सिंह कितीही क्षधेने व्याकुळ झाला तरी, गवत खावयाचा नाही; त्याप्रमाणे कुलीन असतात ते. केवढ्याही संकटांत पडले तरी नीच कमोला प्रवृत्त व्हावयाचे नाहींत." अशीच स्थिात लडा जेन ग्रेची होती. 'खधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ' हे तत्त्व तिच्या अगदी हाडी खेळलेले होते. तेव्हां ती असल्या भटजीबावांना माठ घालणार थोडीच! तिने त्या धर्माध्यक्षांबरोबर खधर्मासंबंधानें पुष्कळ वादाववाद करून आपल्या गहन विद्वत्तेने चांगलीच षोडशोपचार पूजा केली. आणि अखेर वाटाण्याच्या अक्षता कपाळास लावून त्याची बोळवण केली. तेव्हां त्यांनी हिरमुसल्या तोंडाने जाऊन राणीपुढही तसाच नन्नाचा पाढा वाचला. प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु धर्मभ्रष्ट होणार नाही, असा जेव्हां लेडी जेन ग्रेचा दृढनिश्चय बाहेर पडला, तेव्हां अर्थात्च तिचा जीव वाचावयाला काही मार्ग राहिला नाही, व त्याप्रमाणे तीही आपल्या नेहमीच्या शांतवृत्तीप्रमाणे शेवटच्या निरवानिरवीस लागली. शिरच्छेदाच्या आधी थोडा वेळ, तिने आपल्या बापास एक पत्र लिहिले. त्यांत असा उल्लेख आहे: " ज्याच्याकडून माझें आयुष्य थोडेबहुत तरी वाढण्याचा संभव, - - -