या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २२७ एक ठेवले नाही. त्यामुळे त्याची बायकामुलें उघडी पडली. त्यांनी कोठे पाहिजे तेथें रहावें, नाहीतर मरावें अशी पाळी आली आहे. त्याने आपल्या पोळीवर तूप ओढले, आपल्याच पायीं दिवाळखोरी करून पोराबाळांस भिकेस लावलें, असें मटल्यावांचून आह्मी राहणार नाही. तथापि अशा गोष्टीमध्ये आपणास काही विशेष वाटत नाही. कदाचित् त्याच्या पोराबाळांना झोळी फिरविण्याचा सुद्धा प्रसंग गुदरतो. थोडीशी वर्गणी जमते; किंवा जमतही नाही. आणि त्या कुटुंबांतील दीनवाणी मनुष्ये दारिद्यांत किंवा उपासमारीत सपशेल बुडून जातात. तथापि यत्किचित् जरी मागचा पुढचा विचार केला तरी सुद्धां दी दुर्दशा पुष्कळ अंशाने टळेल. एखादा दारूचा ग्लास किंवा तंबाकूची विडी अशा प्रकारची चैन किंवा व्यसने ह्यांना फांटा दिला, तर कांहीं वर्षांनी तरी आपल्या एकट्याकरितांच खर्च करण्याऐवजी इतरांकरितां काहींनाकांहीं तरी मनुष्याला संग्रह करावयास मिळेल. ध्यानीं मनीं सुद्धा नाहीत अशा प्रकारची दुखणीबाणी किंवा नाइलाजाचे प्रसंग कारवार येतात. ह्याकरितां अतिशय गरिब मनुष्याने सुद्धा आपल्याकरितां व आपल्या कुटुंबाकरितां अगदी थोडासा का होईना, संग्रह करून पुढील तरतूद करणे हे त्याचे कर्तव्य आहे. एकंदरीत पाहिले तर थोड्याच लोकांस श्रीमंत होतां येते. परंतु पष्कळ लोकांना उद्योगशीलतेने आणि काटकसरीपणाने आपणांस येणाऱ्या गरजा भागविण्यापुरती, श्रीमंत होण्याची शक्ति येते. वृ. द्धापकाळी दारिद्य किंवा अन्नाला मोताद अशी स्थिति प्राप्त होऊं नये इतकी सुद्धा त्यांच्यापाशीं शिल्लक राहते. तथापि श्रीमंत होण्याला संधि सांपडत नाही, हे कारण नव्हे. तर इच्छा नसते, ही मुख्य अडचण आहे. आपणास काटकसर होत नाही, हा इच्छेचा अभाव होय. मनुप्यांना हाताने व डोक्याने सतत श्रम करतां येतात. परंतु हवा तसा अवाच्यासवा खर्च करणे आणि डामडौलाने राहणे ह्यास मात्र त्यांच्याने अळा घालवत नाही. पष्कळ लोकांना आत्मसंयमनापासून होणारा आनंदच प्रिय असतो. आणि कित्येक मनुष्यांपेक्षां जनावरेंच श्रेष्ठ असतात. ते नेहमी जितकें कमावतात तितकेंच गमावतात. पण असे जे कोणी दिवाळखोर अस