या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. तात, ते निखालस काम करणारेच असतात असे नाही. आपण ऐकतों की, मनुष्ये वर्षानुवर्ष पैसे कमावतात, शेंकडों रुपये वर्षास खर्च करतात, आणि एकाएकी मरण पावतात. आपल्या पोराबाळांना फुटकी कवडी सुद्धां ठेवीत नाहीत. अशा गोष्टी प्रत्येकाला माहित आहेतच. ते गेले ह्मणजे त्यांच्या रहात्या बिन्हाडांतील सामान सुद्धां दुसऱ्याचे असते. त्यांच्या उत्तरकार्याच्या खर्चासाठी आणि त्यांनी आपल्या उधळ्या जन्मांत जें कर्ज करून ठेवलेले असते तें वारण्यासाठी ते विकावे लागते. ज्यांत लेशही लोकोपयोग नाही, व ज्याला काही किंमतही नाहीं, अशा वस्तूंच्या संग्रहाचे दर्शक हा पैसा होय. पण त्याच्याच बरोबर त्याहून पुष्कळ मोल्यवान्-झणजे स्वतंत्र अशा गोष्टींचाही तो दर्शक होय. ती वस्तु ह्मणजे स्वतंत्रता. ह्या दृष्टीने पाहतां, तात्विक दृष्टचाही पैशाचें महत्व फार मोठे आहे. खातंत्र्याचा आधारस्तंभ ह्या दृष्टीने काटकसरीपणा हा साधा व यःकश्चित् गुणच एकदम सद्गुणांतील अत्युत्तम गुणाच्या पदवीवर नेऊन बसवितो. बुलवरनें झटले आहे "पैशासंबंधाची कामें हलकी मी नका. पैसा ही अब्रू आहे.” मनुष्याचे कांहीं उत्तमोत्तम गुण पैशाच्या सदुपयोगावर अवलंबून असतात. जसे:-औदार्य, उपकारबुद्धि, न्याय, प्रामाणिकपणा आणि दूरदर्शित्व. तसेच त्याच्या दुर्गुणांतील पुष्कळ दुर्गुण पैशाच्या दुरुपयोगापासून उत्पन्न होतात. जसें लोभ, कृपणपणा, अन्याय, उधळपट्टी, आणि अविचार. UPTE हातातोंडाशीं गांठ घालून असणाऱ्या कोणत्याहि वर्गाच्या लोकांनी कधीं कांहींच साध्य केलेले नाही. जे लोक मिळते तेवढे सारे खर्च करतात, ते नेहमी दारिद्याच्या काठावरच लोंबकळत रहावयाचे. ते निश्चयेंकरून अशक्त, दुर्बल, व कालाचे आणि देशाचे गुलाम असावयाचे. ते खतःलाच गरीब करून ठेवतात. त्यांना खतःपाशाही मान नसतो, व दुसऱ्यापाशीही नसतो. ते स्वतंत्र पराक्रमी होतील, हे नांव सुद्धा काढावयास नको. मनुष्याच्या आंगचे हिमतीचे अनेक गुण लोपविण्याला एक उधळेपणाच बस्स होतो. Ham पण मनुष्याने काहीतरी संग्रह केला,-मग तो कितीही थोडा, असला तरी हरकत नाही तर त्याची गोष्ट काही वेगळीच असते.