या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जेवढे मितव्ययी होतात. साली लणजे ती : अंक १० वा. अक्टोबर १९०१, त्याने थोडेसेंच भांडवल जमविलेले असले तरी, त्याच्यापासून एका शक्तीचा उगम होतो. त्याच्यापुढे कालाच्या आणि नशिबाच्या चेष्टा चालत नाहींत. सान्या जगाकडे पहावयाला त्याला कांहीं दिकत वाटत नाही. एका रीतीनें तो आपला आपणच धनी असतो. त्याचा सर्व जगावर शक चालू शकतो. त्याला कोणी खरेदीही करू शकत नाहीं, व त्याची कोणी विक्रीही करू शकत नाही. वृद्धापकाळांतील सुख व समाधान त्याला डोळ्यांपुढे दिसत असते. मनुष्ये शहाणी व विचारी झाली ह्मणजे ती बहुतकरून पुढील ततूंद करणारी व मितव्ययी होतात. अविचारी मनुष्य हा रानटी होय. तो जेवढे मिळवितो तितकें खर्च करतो. उद्यांचा, अडचणीच्या प्रसंगाचा, किंवा तो ज्यांच्या आश्रयाने लहानाचा थोर झाला असतो, त्यांच्या उपकाराचा कांहींच विचार करीत नाही. पण शहाणा मनुष्य पुढील विचार करतो. आपल्यावर व आपल्या कुटुंबावर पडता काळ येण्याचा संभव आहे, हे मनांत आणून चालत्या काळांत त्याची तजबीज करून ठेवतो आणि जे त्याच्या जवळचे व आवडते असतील त्यांचीही जपून तरतूद करतो. लग्न करणारा मनुष्य आपणावर केवढी मोठी जबाबदारी घेतो बरें ? कित्येक लोक ही जबाबदारी मोठीशी समजत नाहीत. ती कदाचित् शहाणपणाची रीत असेल, किंवा विवाहित जन्म व त्याची जबाबदारी चुकविण्यामध्येच त्या गहन विचाराचा लय होत असेल. परंतु एकदां का मनुष्याने लग्न केले की, यत्न चालेल तोपर्यंत हाच निश्चय करणे योग्य आहे की, होतां होईल तों प्रपंचांत कधी दारिद्य ठेवू नये. आणि तो कामावरून निघाला किंवा जन्मसंस्कारांतून मुक्त झाला, तर त्याच्या मुलांबाळांचे ओझें लोकांवर पडूं नये. ह्या कारणास्तव काटकसर हे महत्वाचे कर्तव्यकर्म आहे. काटकसरीशिवाय मनुष्याला न्यायी होता येणार नाही, व मनुष्य प्रामाणिकही होणार नाही. निर्दयता ही अज्ञानापासून उत्पन्न होते तरी, पुढील तरतूद न करून ठेवणे ह्मणजे बायकामुलांशी निर्दय होणे आहे. एखादा बाप दारू पिण्यासारख्या निष्कारण व्यसनांत पैसे खर्च करतो; जवळ थोडे बाळगतो; आणि संग्रह असा कांहींच करीत नाही.