या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. नतर तो मरतो, आणि आपल्या उघड्या कुटुंबाला जन्मभर उपासभारत टाकतो. हिला मागे सारणारी निर्दयता दुसरी कोणची आहे काय ? तथापि ही चाल प्रत्येक जातीमध्ये बेधडक वाढत चालली आहे. या बाबतींत कनिष्ठ वर्ग जितका अपराधी आहे, तितकेच त्याच्या वरच्या प्रतीचे व मधले वर्गही अपराधी आहेत. ते आपल्या साधनाच्या बाहेर वागतात, आणि उधळेपणाने राहतात. चैनबाजीचे आणि नटण्या मुरडण्याचे ते शोकी असतात. ते श्रीमंत होण्यासाठी झगडत असतात. कारण, त्यांच्यापाशी पिण्याची उंची उंची मद्यं, मेजवान्या इत्यादि खर्चाची साधनें अनेक असतात. काही वर्षांपूर्वी हाउस ऑफ कामन्समध्ये मिस्तर राम जेव्हां मणाले की, "इंग्लंडांतील वागणुकीचा सूर तृतीय स्वनावर चढला आहे." तेव्हां मोठा हशाच हशा पिकून त्यांची संभावना झाली. तथापि त्यांचे ह्मणणे अक्षरशः खरे होते. आणि त्या कालापेक्षां समां तर त्याहूनही खरे आहे. विचारी लोक असें समजतात की, आयुष्य हे केवळ अळवावरचं पाणी आहे. आणि ह्मणून आमी मोठ्या डौलाने राहत आहों. तात्पर्य, आपण उधळेपणाने वागतों; आह्मी आमच्या दर्जाच्या बाहेर राहतों; आमी आमची मिळकत उधळतों; आणि त्याच्या पाठोपाठ नेहेमी जीवही फेंकून देतो. पुष्कळ लोक पैसा मिळविण्याच्या कामांत दक्ष असतात, पण त्याचा संग्रह कसा करावा, किंवा त्याचा खर्च कसा करावा हे त्यांना समजत नाही. त्यांचा उद्योग आणि चातुर्य ह्यांतील एक करण्यापुरर्त असते. पण त्यांना दुसरें करण्याचीही अक्कल अवश्य पाहिज. चैनीची क्षणिक लहर आमांस चिकटते, आणि तिच्या परिणामाचा विचार न करितां तिला आंत येण्याला मार्ग देतो. तथापि तो निखालस मोहाचाही परिणाम असेल. इच्छा घट्ट दाबून धरली तर आत्मसंयमन सहज होऊ शकेल; व हिमतीने निर्धार केला तर पुढील खर्चाची आगांतुक कारणे टाळता येतील. संग्रह करण्याची संवय पुष्कळ अंशी आपल्या समाजाची स्थिति आणि