या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २३१ जे कोणी आपणावर अवलंबून असतात, अशांची स्थिति सुधारण्याच्या इच्छेमध्ये उत्पन्न होते. जी जी वस्तु जरूरीची नाही ती ती वस्तु काढून टाकते, आणि उधळपट्टीच्या व अवाच्यासवा खर्च करून राहण्याच्या सर्व पद्धति टाकून देते. वस्तु जर गरजेबाहेरची असेल तर ती अतिशय कमी किंमतीला घेतली तरी सुद्धां ती महागच प. डेल. लहान लहान खर्च असेल तोच होतां होतां मोठा होतो. विकत घेतलेल्या वस्तूंत ज्या वस्तू आवश्यकतेच्या नसतात, त्या दुसऱ्याच बाबीने आपणांस उधळपट्टीची संवय लावतात. सिसरोने मटले आहे "पाहिली ती ती वस्तू खरेदी करण्याचे वेड नसणे, ही एक प्रकारची मिळकतच आहे." पुष्कळांना किफायतीचा माल घेण्याची संवय लागलेली असते. "हा अमुक अमुक जिन्नस कितीतरी स्वस्त आहे हो? घेऊ या तर विकत.” “पण त्याचा तुमाला काही उपयोग आहे काय ?" "नाहीं; सध्या नाही. पण 'कः कालः फलदायकः' अहो ! आज नाहीं उद्यां केव्हां तरी उपयोगी पाल." खरेदी करण्याची संवय अशाच त-हेनें चाललेली दृष्टीस पडते. कित्येक लोक चिनी मातीची भांडींच खरेदी करित असतात. आणखी ती इतकी की, त्यांचे एक दुकानच थाटेल! दुसरे कित्येक जुन्या तसबिरी, जुनें सामान, जुनी मद्येच खरेदी करित असतात. ही सारी मोठीच किफायत! ह्या जुन्यापुराण्या वस्तू गि-हाइकांनी 'ऋण काढून सण केल्याप्रमाणे सावकाराच्या पैशाला फारसा खार न लागतां खरेदी केल्या, तर त्यांत फारशी हरकत नाही. पण उधारीपासून फारच तोटा होतो. होयस वालपोल एकदां ह्मणाला “मला आशा आहे की, आतां तेथें मला दुसऱ्या खेपेस विकावयाची पाळी येणार नाही. कारण, माझ्या जवळ आतां एक तसूभर जमीन नाहीं, की शिलकेंत एक सुतडीचा तोडा नाही." मनुष्यांनी वृद्धावस्थेमध्ये आनंदाचा आणि सुखाचा उपभोग मिळावा ह्मणून तरुणवयांत व मध्यम बयांत तयारी करून ठेविली पाहिजे. ज्या एखाद्या मातान्याने आपल्या जन्मापैकी पुष्कळ भाग, श्रमाचे फळ उत्तमरीतीने मिळवून घालविला, त्यालाच एका भाकरीच्या तुकड्याकरितां भीक मागण्याचा प्रसंग यावा, किंवा शेजान्याच्या आश्र