या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. यावर हवाला ठेवून बसण्याची पाळी यावी, किंवा अगदी नवख्या मनुष्यावर अवलंबून राहण्याचा प्रसंग गुदरावा, ह्यापेक्षा अधिक शोचनीय स्थिति ती कोणती? पुढील वयांत आपल्या व आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरतां अल्पवयांतच उद्योग करण्याच्या निश्चयाची व शिल्लक टाकण्याची बुद्धि मनुष्यमात्रामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. खरोखर काटकसरीचा अभ्यास तरुणपणांतच करावा. ह्मणजे वृद्धापकाळी आपल्या संपत्तीची यथास्थित वांटणी करावयास मिळते. मात्र आद्यापेक्षां खर्च अधिक होता कामा नये. तरुण मनुष्याला पुढचा काल अधिक असतो. त्यामध्ये त्याला काटकसरीच्या तत्त्वांचा अभ्यास करता येतो. आणि माताऱ्याची धांव संपत आलेली असते, आणि त्याला जगांतील कांहींच आपल्या बरोबर नेतां येत नाही. पण मनुष्याची चाल बहुधा अशी नाही. सांप्रतकाळी तरुण मनुष्य, ज्याची धांव संपत आली आहे, अशा आपल्या बापाइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक खर्च करतो, किंवा खर्च करण्याची इच्छा करतो. तो हवा तसा-नव्हे अगदी अवाच्या सवा खर्च - रित सुटतो. बाप जेथे आपला जन्म संपवितो, तेथून तो आपल्या जन्मास सुरवात करतो. बाप ह्याच्या वयांत जितका खर्च करित होता, त्याच्यापेक्षाही हा अधिक खर्च करतो. आणि मग त्याला लौकरच आढळून येते की, आपण कर्जामध्ये आकंठ बुडालों आहों. तो आपल्या निरंतरच्या गरजा भागविण्याकरितां बेधडक हवे ते उपाय योजतो आणि आडमार्गाने पैसा मिळवितो. तो लौकर लौकर पैसा मिळवण्याच्या खटपटीस लागतो. तो मोठमोठाले सट्टे मारतो; आहाराबाहेर व्यापाराची उलाढाल करतो; आणि हां हां ह्मणतां खड्डयांत पडतो. तेव्हां त्यास अद्दल घडते किंवा अनुभव येतो. पण तो चांगल्या कामाचा मात्र नव्हे, तर वाईट कामाचा. साक्रेटिसाने कुटुंबांतील बापांना उपदेश केला आहे की, जे कोणी काटकसर करणारे शेजारी असतील, जे आपला पैसा सत्कारणी लावित असतील, त्यांच्याकडे पहात असावे. आणि त्यांचाच कित्ता वळवून नफा मिळवावा. काटकसर ही नेहेमी व्यवहारोपयोगी असून अनुभवावरून ती उत्तम रीतीने शिकता येते. समजा, की