या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें... गेलेल्या मितव्ययी ऋषिवर्याचे व महात्म्यांचे ऋणीच असले पाहिजे. त्यांनी त्यांची वचनें मान्य करून खर्च कमी करण्याची कला शिकावी. कारण, काटकसर केल्यावांचून कोणालाच श्रीमंत होतां येत नाही. आणि ती करणारांपैकी थोडेच गरिब राहतात." -काटकसर ही अभ्यास करण्यासारखी बाब आहे खरी, अशा दृ. ष्टीने जेव्हां तिच्याकडे पहावें, तेव्हां तिचे ओझें असें मुळीच वाटणार नाही. आणि ज्यांनी तिचा पूर्वी कधीं अनुभव घेतला नाही, त्यांनी थोडेसे पेन्स व शिलिंग आठवड्यांतून बाजूस काढून ठेवले तरी, तेवब्यानेच नैतिक योग्यता केवढी वाढते; मनाची किती कमावणी होते; आणि आत्मखातंत्र्य किती जोरावतें, हे पाहिले झणजे तर ते आश्चर्याने चकित होऊन जातील. काटकसरीच्या ह्या प्रत्येक गुणाचा प्रत्यय आलेला आपल्या दृष्टीस पडतो. तिचा जारीने अभ्यास केल्यास उन्नति होते; आत्मसंयमन ह्मणजे काय ते पहावयास सांपडते; आणि सदाचारास पुष्टि मिळते. तिच्या योगाने मन सन्नियामक होते; ती नेमस्तपणाचे पोषण कशी ती दूरदृष्टीच्या पायावर उभारलेली असते; ती उच्चप्रतीच्या लक्षणांची ओळख करून देते; ती अनावर मनाला आटोक्यात ठेवण्याचा गुण देते. आणि सर्वांपेक्षां शांति उत्पन्न करते; काळजीला झुगारून देते; काटकसर नसली तर जे शेकडो त्रास व काळजा आह्मांस जाळून टाकावयाच्या त्यांना पळवून लावते. . कित्येक ह्मणतील की “हे होण्यासारखे नाही." पण प्रत्येकाला थोडेबहुत-काहींना काही तरी-करता येईल. "मला होत नाही." ह्या मंत्रानेच मनुष्यांचा आणि राष्ट्रांचा फडशा पाडला आहे. वस्तुतः इतकी मोठी कुरकुर कोणतीच नाही की, जी मिटवितां येत नाही. एखादें उदाहरण ध्या. दररोज दारूचा एक ग्लास घेतला तर वर्षाचे ४५ शिलिंग होतात. हीच रक्कम एखाद्या मनुष्याने जन्मभर सांठवून ठेविली तर, १३० पौंड त्याच्या मरणसमयीं त्याला देतां येतील. अथवा तीच रक्कम सेव्हिगब्यांकेमध्ये ठेविली तर २० वर्षांत त्याने १०० पौंड होतील. असे असतां पुष्कळ लोक दररोजचे सहा सहा