या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. दारूचे ग्लास झोंकतात! इतक्या दिवस दारू घेतली नाही, तर व्याजाव्याजाने त्याचे ६०० पौंड होतील. जो मनुष्य प्रत्यही दारू पिण्यांत ९ पेन्स खर्च करतो, तो ५० वर्षांत सरासरी २००० पौंड उधळतो असे होते. पुस्तकपरीक्षा. संसार-'ही लहानशी कविता' रा. रा. मोरो गणेश लोंढे, हेडमास्तर, नागोठणे, ह्यांनी तयार करून छापवून तिची एक प्रत आमच्याकडे पाठविली, ह्याबद्दल आभार मानून तिचे गुणदोषविवेचन करूं या. रा. लोंढे हे चांगले सुशिक्षित आहेत; लेखनाकडे त्यांचा कल विशेष आहे. त्यांचा कवितेवरील व्यासंग फार दिवसांचा आहे. फावल्या वेळांत मुलांस व जनांस कविताद्वारें उपदेश करण्याचा त्यांचा क्रम अत्यंत स्तुत्य आहे. ते विषयाची निवड चांगली करतात; भाषा बहुतेक सरळ व बरीच सुबोध असते. विचार प्रौढ वधांगले असतात. तेव्हां ते अर्वाचीन कवींत बरेच वरच्या प्रतीत मोडतील हे सांगणे नकोच. अनेक वर्तमानपत्रकारांनी व मासिक पुस्तककारांनी आणि कितीएक विद्वानांनी त्यांच्या कवितेवर चांगले चांगले दिलेले अभिप्राय त्यांनी कित्येक पुस्तकांच्या कव्हरांवर छापलेलेच आहेत; व त्यांच्या बहुतेक पस्तकांना डे, व्ह. ट्रा. सोसायटीने बक्षिस दिलेले आहे, तेव्हां त्यांच्या गुणसंबंधाने अधिक स्तोत्रपाठ गाणे झणजे केवळ चर्वितचर्वण करणे किंवा 'री' ओढणे आहे. तेव्हां त्याची त्यांना विशेष आवश्यकता असेलसें वाटत नाही. प्रस्तुत पुस्तकांत संसार हा सार आहे की असार आहे ? ह्याचे विवेचन असून जो उत्तम रीतीने संसार करील त्यास संसारांतच परमार्थ साधता येतो हे तल उत्तम रीतीने सिद्ध केले आहे. परंतु कवीची गोष्ट आणि चिताऱ्याची गोष्ट जवळ जवळ सारखी आहे. चिताऱ्याला जसे आपल्या चित्रांतील व्यंग कधीं कधी दुसऱ्याने सांगितल्यावांचून ध्यानात येत नाही, त्याचप्रमाणे कवीला. ही आपल्या कवितांतील दोष कळत नाहीत. आणि ते कळणेच त्याला अधिक इष्ट असते. कारण पुढील सर्व काव्याची सुधारणा ह्मणा किंवा सरसव ह्मणाही त्याच्यावर अवलंबून असतात. ह्यास्तव तें दाखविणे हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे असे समजून आतां दोषांकडे वळू. prmana