या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. इतक्या वहिवाटलेल्या व नावाजलेल्या कवीच्या हातून छंदोभंगासारखे दोष होणे ह्मणजे ती चूक नव्हे घोडचूकच समजली पाहिजे. उदाहरणार्थःठेवा विवेक भ्रमतां मन आवरावें । ठेवील देव जगतांत तसें रहावें ॥ ह्यांत 'भ्र' ह्या द्वित्त्व अक्षराच्या योगाने मागील 'क' अक्षरास द्वित्त्व येऊन छंदोभंग झाला आहे. पण ती गोष्ट कवीच्या लक्ष्यांत आली नाहीशी दिसते. ही कांहीं सामान्य हेळसांड नव्हे, तसाच व्हस्वदीर्घ शब्दांविषयींचा विचार आहे. होतां होईल तो व्हस्वदीर्घाविषयीं कवीने फार जपले पाहिजे. निरंकुशवा'ची सनद पाहिजे तेथें लागू करता कामा नये. पति "साधुनियां दवडिलें पळिं कामुकानें" ह्यांतील 'पळिं' शब्द किती कर्णकठोर लागतो बरें ? ह्याचा कवीने विचार करावयास नको काय? शब्दरचनेला व यमकरचनेला जपणे हेही मराठी कवितेतील अति महत्वाचे काम आहे. पण त्यांत रा. लोंढे हे फारच घसरले आहेत. पहा:ठेवी स्वकीय दयितेवरि मात्र चित्त । ईशास गाय, तरि तो दुसरा महंत ५६ 'चित्त' आणि 'महत' दोन्हीं यमकें मोठी प्रासादिकच खरी! पण ह्या - वरची कडी पुढेच आहे. पहा:उद्योग नित्य करुनी धन मेळवावें । पाहून संचय, मनामधिं धन्य व्हावें ॥ खचूंनि वित्त टुमदार करून कायें । आप्तांकडून बरवें ह्मणवून घ्यावें ॥ ११॥ - मास्तरसाहेब उपदेश करतात:-"वित्त खचून 'टुमदार' कार्ये करून आसांकडून चांगले ह्मणून घ्यावें बरें!” आणि ह्याच नियमाबरहुकूम त्यांनी आपले पद्यही 'टुमदार'च वठविले आहे. शब्दलालित्य हे कवितेत साधण्याचे एक मोठे आंग आहे. तेंच छिन्नभिन्न केल्यावर मग कवितेचा जंगजोड काय विचारावा ? 'टुमदार' शब्द कोठे व कधीं योजावा ह्याचे येथे कवीस भान राहिले नाही. आणखी, वर 'कार्य' आणि खालीं 'ध्यावें.' काय पण यमकांची जोडी! लोंढ्यांचें कवित्व तारिफ करण्यासारखें व बक्षीस देण्यासारखे खरेंच ! सबंध चरणच्या चरण यमकमय करण्यांत लोकोत्तर चातुर्य लागते; तीन चार अक्षरांचे सांधणे ह्यांत ही उत्तमरीतीनें काव्यकौशल्य व्यक्त होते. दोन दोन अक्षरें साधणे हे कवित्वाचे लक्षण आहे. निदान उपांत्य स्वर व अंत्याक्षर येवढ्याची तर कवीने उपेक्षा करतांच कामा नये. केवळ एक अर मात्र 'ट' स 'ट' जुळविणे झणजे निखालस काही तरी! पण जगाची सर्वच