या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. ह्यांतील 'भी' आणि 'आजवेरी' हे दोन्ही शब्द ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. नुसता 'भी' शब्द घालण्यापेक्षां 'भीती' शब्द घातला असता तर तो उत्तम दिसला असता, व निरर्थक 'ही' शब्दही आला नसता. 'आजवेरी' शब्द किती 'टुमदार' आहे हे निराळे सांगत बसण्याची काही जरूर दिसत नाही. खालचा एक शब्द ह्याहूनही मजेचा आहे:'ऐशा धना अवर का ह्मणतां उगाच । तें मेळवा धरुनियां वर मार्ग साच १" ह्यांतील 'अवर' शब्दाचा अर्थ टीप पाहिल्याशिवाय कोणाच्या ध्यानांत येणार ? वर ह्मणजे श्रेष्ठ आणि अ-वर झणजे श्रेष्ठ नव्हे तें; हलकें, असा अर्थ. काय ही शब्दलालित्याची तहा! तसेंचः"संसार हा शकट दोन तयास चाकें । स्त्री आणखी पुरुष त्यांविण सद्म ओकें ॥ मेजवानीला बसवितांना रावसाहेबांच्या शेजारी एखादा गलिच्छ आचारी आणून बसवावा; त्याच्या पलीकडे एक वाईकर भटजी बसावेत, व लगेच त्याच्या शेजारी एखादा श्रीमंत जहागीरदार बसवावा, झणजे जशी त्या पंक्तीला शोभा येईल, त्याचप्रमाणे वरच्या पद्यांतील शब्दसंघाची शोभा आहे. 'शक आणि 'चाकें' हे शब्दयुग्म केवळ समानशीलच खरें ! 'स्त्रीपुरुष' ह्या सामासिक शब्दांत जी खुमारी आहे, ती त्यांस विभक्त केल्याने कशी येणार ? 'सद्म' आणि 'ओके' हे दोन शब्द पारिसच्या प्रदर्शनांत पाठविले असते, तर खरोखरच फार चीज झाली असती! मलमलीला गोणपाटाचे ठिगळ लावले, तर त्याचा उपभोग घ्यावयाला 'प्रतापराव'च पाहिजेत. आणखी:"रूपाहुनी सुबक वर्तन नित्य ज्याचें । त्याच्या मनी मग मदास बि-हाड कैचें ॥ 'सुबक' शब्द वर्तनाला लावणे झणजे भाषाभिज्ञतेची एक साक्षच होय. त्यापेक्षां 'सरस' शब्द घातला असता तरी त्याहूनही पुष्कळ पटीने बरे झाले असते. खालील उपमा ह्मणा, किंवा दृष्टांत ह्मणा, किंवा इडिओम्याटिक ल्यांग्वेज ह्मणा-पण ध्यानात ठेवण्यासारखी आहे:"पोटास मागत असे पसरून तोंड । यावी उरांत असलें करितांच घोंड ॥८७॥ सरल अर्थ सांगावयाला प्रस्तुत कवीला किती आढेवेढे घ्यावे लागतात, हे वरील वाक्यावरून सहज ध्यानात येण्यासारखे आहे. अपरिचित शब्द घात - ल्यामुळे प्रस्तुत कवीच्या कवितेतील अर्थ काढावयास किती प्रयास पडतात, हैं