या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १९०१. २३९ स्पष्ट दृष्टीस पडण्यासाठी आणखी दोनच पद्ये दाखल करून हे प्रकरण आटोपतों. ती दोन पये ही:"भार्या असे बहुगुणी पतिला न भावे । त्याने कधी न विहिताचरणा पुसावें ॥ गांजावयास सतिला न कमी करावें । पाहून हे मन न केवि विदीर्ण व्हावें ९५ हा देहही जरि जिवाप्रति सोडणार । मातापितापतिसुतादि नको विचार ॥ आधी कुणी मग कुणी परि पावणार । पंचत्त्व, सर्व असुखास करा न थार ।। ह्यामध्ये रा. लोंढ्यांनी सरल अर्थाला विनाकारण कसें वांकविलें आहे, ह्याची आणखी वेगळी फोड करण्याची तादृश आवश्यकता दिसत नाही. ही पये वाचतांच ती गोष्ट लक्ष्यांत येईल. 'टाळकुट्या तुक्या' ह्मणणे विनोदांत कदाचित् खुलेल, पण कवितेत औरंगजेबाच्या तोडीस बसविलें तरी सुद्धा तें विशोभित होय. तसेंच 'दुःखोमि नाश वरितील' असे प्रयोग करणे हेही कवित्वगुणास उणीव आणणारे आहे. मराठी कविता करणाराने मुख्य गोष्ट ही लक्ष्यांत ठेवली पाहिजे की, ती होतां होईल तो शुद्ध, सरळ व हृदयंगम वठली पाहिजे. काही तरी करावयाचे झणून करावयाचे, अशा करण्यांत कांही अर्थ नाही. त्यांत थोडे तरी विशेष झाले पाहिजे. केवळ छंदांत शब्दांची रचना करावयास कांही मोठीशी बुद्धिमत्ता नको. तें काम साधारण मनुष्य सुद्धा करूं शकेल. कवीमध्ये चिरस्थायी नांव होण्याला काही तरी करामत पाहिजे. गाबाळग्रंथी १०० पद्यांपेक्षां मनोरम असें एक पद्य असले तरी त्याची योग्यता मोठी आहे. खालचा श्लोक साधा असून किती मनोल्हादक आहे पहाःनको धाउं बा चातका मेघ नाहीं । धुराचा गमे लोट हा नीट पाहीं नया प्रार्थितां तूज पाणी मिळेल । तुझ्या मात्र डोळ्यांतुनी ते गळेल॥ र द्या पद्याचा हवा त्या आंगाने विचार करा; तरी प्रत्येक खेपेस मन अधिक अधिकच प्रसन्न होईल. हाच कित्ता पुढे ठेवून आमचे मराठी नूतन कविडिल आपला प्रयत्न पुढे चालविल तर, ते फार मान्यतेस चढेल ह्यांत शंका नाही. रा. लोंढे यांचे गुण जरी पूर्वी आह्मी थोडक्यात सांगितले, तरी ते जलींच्या कवींत पुष्कळच वरच्या प्रतीत गणण्यासारखे आहेत, ह्यांत शंका नाही. तथापि त्यांस पुढीळ कृतीस आणखी साह्य मिळून त्यांची कीर्ति व गुण विशेष रीतीने लोकांपुढे यावेत हा हेतु धरून आह्मी त्यांस ह्या सूचना केल्या आहेत. व्यांची आमच्याकडे पुष्कळच पुस्तकें आलेली आहेत, तथापि ह्या एकाच्या सूचनेवरून बहुतेकांचे चांचण झाल्यासारखेच आहे, असे समजून अधिका