या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० केरळकोकिळ, पुस्तक १६ वे. कडे तूर्त आह्मी वळत नाही. ह्या आमच्या सूचनांचा रा. लोंढे यांस विषाद न वाटावा अशी इच्छा करून हा अभिप्राय पुरा करतो. पत्रव्यवहार, रा०रा० केरळकोकिळ कर्ते यांस-सा० न० वि. वि. लिहिण्यास कारण की, वाल्मीकी रामायणावरून पंचवटीविषयीं आझांस आलेल्या शंका याखाली लिहून आपणाकडे पाठविल्या आहेत; तर चांगले मनन करून त्या शंकांचे आपण निराकरण कराल अशी आशा बाळगितो. पितृआज्ञेनुसार रामाने वनवास पत्करिल्यावर तो काही काळाने दंडकारण्यांत पोहोचला. दंडकारण्यांत गेल्यानंतर त्यास लौकरच नासिक लागते. तेव्हां नासिक हे जर पंचवटी आहे, तर रामास सगळे दंडकारण्य फिरण्यास दाहा वर्षे लाग. ल्यावर पंचवटीचे जें वर्णन केले आहे, त्यावरून दंडकारण्यांत पंचवटी नसावी. पण गोदावरीच्या मुखाजवळ पंचवटी धरल्यास नासिकच मानावयास पाहिजे, हे उघड आहेच. तथापि गोदावरीच्या दक्षिण तीरावर पंचवटी आहे. असें वर्ण। असल्यामुळे तीर या शब्दाने जेथें नदी समुद्रास मिळते ती जागा असा दिसतो. तशांत जनस्थानारण्यापासून पश्चिमेकडे जाऊन पुनः दक्षिणेकडे गेलें झणजे तीस कोसांवर क्रौंचारण्य ( करनोल? ) लागते, तेथून पूर्वेस तीन कोस गेल्यावर मातंग मुनीचा आश्रम मिळतो. त्या स्थलाहून ऋष्यमूक पर्वत व पंपासरोवर जवळ आहे. यावरून राम ज्या पंचवटीमध्ये राहत होता ती पंपेपासून फार तर ३५-४० कोसांवर असावी. परंतु नासिकापासून पंपा २०० कोसांपेक्षा जास्त अंतरावर आहे अर्थात् नासिक पंचवटी धरल्यास पंपा, किष्किंधा, रामेश्वर, लंका वगैरे स्थलें पश्चिमेकडे आरबी समुद्रांत न्यावी लागतात असे दिसेल. आपण याबद्दल प्रथम पुष्कळ लिहिले आहे, तरी आतां पुनः एकवार थोडक्यांत उत्तर देऊन आभारांत ठेवणे. आपण सुज्ञच आहां. कळावें लोभ असावा, ही विनंति. मडगांव.-ता०। १८-१०-१९०१. आपला एक हितेच्छु. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVACY DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.