या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. पण बहतेक बाबतींमध्ये गजांतलक्ष्मी ह्मणून प्रतिष्ठा मिरविणान्या हत्तीहूनही पुष्कळपटीनें तो अधिक आहे. खंदा वारू युद्धाच्या कामांत फारच उपयोगी पडता. प्रत्यक प्रसिद्ध योद्धयाचा एक एक आवडता वारू असे, व त्या परस्परात अत्यंत प्रेमभाव राहत असे. तो इतका की. केवळ जीवप्राण. शिकदर बादशहाचा 'वृषभशिरि दत्ताजी शिंद्याचा लालमणी, इत्यादि खद वारू तर इतिहासप्रसिद्धच आहेत. कित्येक अश्वरत्नांनी आपल्या जखमी होऊन पडलेल्या धन्याला रणांगणांतून अल्लाद उचलून सुरक्षितपण घरी आणून त्याचे प्राण वाचविले आहेत. कितीएक खंद्यावारूंनी धन्याच्या शब्दाबरोबर तरवारीच्या खणाखणींत, व तोफेच्या धडाख्यात मुसडी दिली आहे: कितीएकांनी धन्याच्या प्रीत्यर्थ धारातीर्थी दह ठवले आहेत; तेव्हां अशा प्राणिरत्नाची महती ती किती गावी ? पेशव्यांच्या कारकीर्दीत शिंद्याच्या लष्करांतील घोड्यांची व त्यांच्या संपत्तीचीही फार ख्याति होती, व तत्कालीन वृद्ध लोकाच्या ताटा पुष्कळ गोष्टी असत. एक वेळ शिद्यांनी आपल्या घोड्याचा चतुर दाखविली. ती अशी की, एक कोसपर्यंत सारख्या दुतफो चादाच्या समया लावून त्यांच्या वाती पेटविल्या, व मध्ये एक हात जागा ठेवली आणि त्यांतून घोडे फेरून आणले. पण चमत्कार हा की, त्या समयांतील एकही वात विझली नाही! त्याच वेळी एका घोड्याच्या गळ्यातील खऱ्या मोत्यांचें पेंढें तुटले, आणि त्याची मोत्ये चहूंकडे पसरली, ती गोरगरीबांनी वेंचून नेली. शिद्यांचे लोक त्यांस शिवले सुद्धा नाहींत. असे सांगतात की, दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीदीत परदेशांतून एक घोडा विकावयास आला होता. त्याची किंमत त्याच्या मालकानें एक लाख रुपये सांगितली होती, व त्यांत तो एक पे सुद्धा कमी करीत नव्हता. ह्या घोड्याचा इतमामही फार विलक्षण होता. त्याच्या तैनातीला अनेक लोक होते. त्याला निजावयाला खुनीच्या गाद्या होत्या. काहडण्या वगैरे सामान रेशमाचे असून लगाम वगैरे चांदीचा होता. त्याच्यावर चाकर लोक चवया ढाळीत. हा घोडा पुण्यास आला, तेव्हां तो पहावयास गर्दीच्या गर्दी जमत असे. कि त्येक श्रीमंत लोकांनी शेकडो रुपये देतो, आपणास एक वेळ त्यावर