या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. श्रीमंतांना उगेंच बसावे लागले, परंतु त्या घोड्याच्या संबंधानें श्रीमंतांच्या मनांत अठी होतीच. . अखेर शेवटच्या युद्धांत बापू आपल्या आवडत्या घोड्यावरच बसून विद्युल्लतेप्रमाणे हिकडून तिकडे आणि तिकडून हिकडे, सैन्यामध्ये, युद्धाच्या गर्दीत फिरत होते. त्यास पाहून श्रीमंत खोंचून बोलले की, बापू! आपल्या ह्या आवडत्या घोड्याचा पराक्रम काय आहे तो बाहेर पडू द्या की एकदां! बापूंनाही ते शब्द वर्मों लागले. त्यांनी आपला घोडा खाकर श्रीमंतांपुढे उभा केला, आणि विचारले की, समोरच्या कोणत्या योद्धयाचे मस्तक कापून आणू त्याची आज्ञा व्हावी. श्री. मंतांनी एका हत्तीच्या अंबारीत बसलेल्या योध्याकडे बोट दाखवून मटले, त्या सरदाराचे मस्तक कापून आणावें. श्रीमंतांच्या तोंडांतून हे शब्द पुरते निघतात न निघतात, तोच बापूंनी आपल्या अश्वरत्नाला टांच दिली. त्याबरोबर तो घोडा नजर ठरेना अशा वेगानें सैन्यांत घुसला. आणि त्याच्या वेगाने पायदळ केवळ दुभंग झाले. आणि हां हां ह्मणतां घोड्याने तो हत्ती गांठला, व ताडकर हरणाप्ररी त्याच्या गंडस्थळावर त्याने उडी मारली. बापूंनी झटकर सरदाराचे मस्तक कापून हातांत घेतलें, आणि तसाच घोडा परतवून येऊन श्रीमतांच्या चरणावर ठेवले, आणि पुन्हां आणखी काय आज्ञा ? ह्मणून विनंती केली. तेव्हां श्रीमंतांनी दुसरा एक तसलाच सरदार दाखवून दिला. बापूंचा घोडा ह्या खेपेस तर पायदळांतून वाट न मिळाल्यामुळे डोक्यावरून सुद्धां उडत गेला, व त्याने दुसरा सरदार गाठला. बापूंनी पहिल्याप्रमाणेच त्याचाही शिरच्छेद करून ते मस्तक श्रीमता: पुढे ठेवले. तेव्हा श्रीमंतांची मर्जी किती सुप्रसन्न झाली असल, सांगणे नकोच. त्यांनी 'धन्य धन्य ह्मणून बापूंची पाठ थाप परंतु बापू पुन्हा आज्ञा मागू लागले. पण ती श्रीमंत देईनात. या फार हट्टास पडले तेव्हां श्रीमंतांनी पुन्हा एक सरदार दाखवून त्यावर पूर्वीप्रमाणेच वीरश्रीनें बापू निघाले. पण हिकडे शत्रू न्यांत फारच हाहाःकार उडाला होता. शत्रूकडील वीर म की, हे आहे तरी काय ? एक घोड्यावर बसलेला राउत येता, अचानक एक एका वीराचे मस्तक कापून नेतो! आणि आपण सार शत्रूकडील वीर ह्मणूं लागले