या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक ११ वा. नोवेंबर १९०१. भांबावल्याप्रमाणे तोंडाकडे पहात बसतो. हे फार लाजिरवाणे आहे. असें ह्मणून साऱ्यांनीच तो घोडा कसेंही करून हाणून पाडण्याचा विचार केला. बापूंचा घोडा पूर्वीप्रमाणे गजगंडावर तर उड्डाण करून गेलाच, व बापूंनी पूर्वीप्रमाणेच आपल्या समशेरीचें काम बजावून शत्रूचे शिरकमल हातामध्येही धारण केलेंच, परंतु परत येतांना त्यांच्या घोड्यावर शत्रूच्या लोकांनी एकदम हल्ला केला, आणि त्या गर्दीत त्याच्या फऱ्यावर असा एक घाव घातला, की तें अश्ववीरशिरोरत्न रक्ताने लालीलाल होऊन गेले. त्यामुळे बापूंच्याही मनास धक्का बसला. तथापि बापूंनी तशाच थाटाने येऊन श्रीमंतांच्या चरणावर शिरकमळ ठेवून मुजरा केला, आणि श्रीमंतांस पुन्हा आज्ञा विचारूं लागले. परंतु श्रीमंत काही केल्या देईनात. तेव्हां बापू ह्मणाले "माझ्या प्राणापेक्षाही आवडता घोडा गेला, आतां मला तरी वांचून काय करावयाचे आहे ? माझ्या शौर्याची व पराक्रमाची सारी भिस्त शा, माझ्या आवडत्या घोड्यावर होती. याकरितां आतां प्रभुकार्यापाला आमी उभयतांही धारातीर्थी पतन पावणार, असें ह्मणून ते पुन्हा त्याच आपल्या घोड्यावर बसून गर्दीत घुसले ते घुसले." पुन्हा दृष्टीस पडले नाहीत! ही आख्यायिका कितपत खरी आहे, हे कांहीं आमच्याने सांगवत नाही. तथापि तिच्यांत अगदीच तथ्यांश नसेल, असें ह्मणवत नाही. निदान पूर्वीच्या घोड्यांत अशी अपूर्व करामत होती, येवढे तरी सिद्ध होते. घोड्यांमध्ये अनेक जाती आहेत. पण त्या सर्वांत आरबी घोडा हा श्रेष्ठ प्रतीचा मानतात. त्याच्यासारखी देखणी, काटक, विश्वासू, व बळकट जात दुसरी नाही. आरबी लोकांना घोडा फार प्रिय आहे. त्यांचे आपआपल्या धोड्यावर जीवस्य कंठस्य प्रेम असते. जर्मनींतील घोडे अतिशय उंच असतात. त्याजवर चढावयास मनुप्याला दोन दोन रिकिब्या कराव्या लागतात. अमेरिकेसारख्या कितीएक देशांत जंगली घोड्यांचे कळपच्याकळप आढळतात. इतर जंगली जनावरांप्रमाणेच जंगली घोडे मोठे पाणीदार, चपळ, व भयंकर असतात. तथापि मनुष्ये हरएक युक्तीने त्यास धरून माणसाळवितात, आणि ते आपल्या कामी उपयोगी पडतील असें करितात.