या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. घोड्यांमध्ये एक लहानसर जात असते. तिला बट किंवा तट्ट अस मणतात. ह्या बटांमध्ये कितीएक बटांची चालण्यामध्ये फार आख्या आहे. ब्रह्मदेशाजवळील पेगू प्रांतांतील बट फार प्रसिद्ध आहेत. त्यांस पेगू हेच नांव चालते. पेगू दिसण्यांत अगदीच बढब दिसतात. त्यांची कानकळाशी चांगली नसते, व सर्वांगावर विशोभित व उखरवाखर लव असते. आणि मुद्रा पाहिली तर मदाड दिसते. पण चालण्याच्या कामांत ते इतके जबरदस्त असतात की, त्यांच्या बरोबर मोठा घोडा सुद्धा टिकणे कठीण! त्याच्या किबीत पाय टाकला पुरे, की तो तुर्की चालीवर इतक्या झपाट्याने जातो की, त्याच्या त्या अप्रतिम चालीचें कोणासही कौतुक वाटावे. हा तुकी चाल, जन्मतःच त्यास प्राप्त झालेली असते. त्यास तो कोणी शिकवावी लागत नाही. पेगू फार करून कधीं भरधाव पळत नाही. व पळाला तरी आपल्या नित्याच्या चालीहून फारसा पल्ला त्याच्याने गांठवत नाही. आणि शिवाय तसे केल्यास तो लोकर दमतो. पण त्याच्या स्वाभाविक तुर्की चालीनें तो कधींच दात नाही. त्यामुळे ह्या पेगू बटांस कमीतकमी ४००६०० रुपये तरी किंमत पडते. ब्रिटिश बेटामध्येही जंगली घोड्यांच्या अनेक जाती आढळतात. त्यांमध्ये अतिशय उंची जात झटली झणजे शेटलंडांतील बट हा हा विलक्षण, सुलक्षणी, देखणा व पाणीदार प्राणी स्कॉटलंडाच्या उत्तरस जी बेटे आहेत. त्यांत आढळतो. तेथे हे बट रानोमाळ मटकत फिरत असतात. आणि जे कोणी प्रसंगवशात त्यांस धरतात, व ज्यांस ते सांपडतात ते त्यांस पाळन त्यांजकडून काम घतात. यांची उंची सरासरी ३६ पासून ४० अंगळेपर्यंत असते. ति विचार केला झणजे शेटलंडांतील बट अतिशय मजबूत आहत मटले पाहिजे. ते आपल्या पाठीवर हवा तेवढा उंच व जडश मनुष्य घेऊन तुर्की चालीवर सहज दौडत जातात. ह्यांपैकी एका हानशा बटाने १६८ पौंड वजनाचा एक मनुष्य एका दिवसात मैल नेला होता. ह्या बटांचे मस्तक लहान असते; मान आंखूड सते; आणि तिची फारच ऐटदार कमान झालेली असते. व तिच्या