या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २४७ वर घनदाट आयाळ सारखी गजबरलेली असून, तिचा झुबकाच्या झुबका त्याच्या तोंडावर पडलेला असतो. त्यामुळे त्यास पाहतांच पाहणाराला सिंहाची आठवण होते. त्याच्याच बेताची गाडी करून त्यास जुपला तर, हा बट बेसुमार धांव घेतो. बायकांकरितां लहान गाडी करून हे दोन सारखे बट जोडले, तर तो देखावा अतिशय शोभायमान दिसतो. स्त्रियांचे गुणधर्म, MARATHश्लोक (भुजंगप्रयात). पदार्थामधे राहती दोन धर्म । तयावीण कांहीं घडेनाच कर्म ॥ गमे वस्तु अत्यंत जी सौख्यदाती । परी होतसे दुःखदाती गदा ती १ चिरंजीव आहेत ही दोन अंगें । दिसू लागती भिन्नरूपें प्रसंगें ॥ सुराचा तयामाजि अत्यल्प वाटा । सदा आदळी दुःख लाटा ललाटा २ पर ज्ञान कैसे पहा ह्या जनांचें । मनीं एक घेवोनियां पक्ष नाचे ॥ सुखामाजि त्याला नये दुःखगंध । करी मोह सर्वांस हा शुद्ध अंध ॥३॥ जगी आवडीच्या जरी वस्तु नाना । तरी श्रेष्ठ ही स्त्रीच वाटे जनांना ॥ भुलोनी तिला तोडिती जीव फार । सदा सोशिती दुःखसंसार-भार ॥४ तिच्या वांचुनी प्रीतिचे पात्र कोण । जिवाचे तिला होतसे लिंबलोण ॥ मुखाला तिच्या बोलती चंद्र पद्म । गमे कल्पवल्ली महा सौख्यसद्म ॥५॥ परी सारखी ती कडू आणि गोड । गुणामागुनी तीस एकेक खोड ॥ करोनी पहा सूक्ष्म थोडा विचार । तरी अंतरीं शुद्ध येईल सार ॥६॥ मृदुत्वांत लोण्याहुनी तीच थोर । असे तीच वज्राहुनीही कठोर ॥ किती गोड ती अमृताचीच लूट । कडू होतसे तैं उणें काळकूट ॥ ७॥ दयाळ अशी माय की बाप साजे । करी घात ते शत्रही तीस लाजे ॥ व्रतें जानकीसारखी तीच वागे। कधी टाकते तीच वेश्येस मागें ॥८॥ कधी स्वर्गिच्या लाजवीते सुखाला । कधीं काळिमा तीच आणी मुखाला॥ उदारांमधे होतसे तीच कर्ण । कधीं देइना वाळलें एक पर्ण ॥९॥