या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. मुलाचे करी लाड नाहीं सुमार । गुरासारखें मारित मारमार || कधी कष्ट काढी उगी ना निमेष । कधी झोप घे आळशी शुद्ध वेष १० कधी नम्र बोले जणों काय गाय । कधीं राक्षसी आपटी हातपाय ॥ सुशीला कधीं होतसे साधुसंत । कधी त्राटिका कैकया मूर्तिमंत ॥११॥ कधी लाज सोडोनि हांसे अचाट । कधीं लोचनीं अश्रुचा थोर पाट ॥ कधी शांतवृत्तींत संसार मांडी । कधी आदळी आपटी सर्व भांडी १२ कधीं कंचुकी घालिते फार तंग । कधी दाखवी सर्व लोकांस आंग ॥ सजोनी कधी लाजवीते नटाला । कधी घेतसे जीर्ण ऐशा पटाला ॥१३॥ कधी देव पूजी ह्मणे माय बाप । कधी देत त्याला शिव्या आणि शाप ॥ भिकाऱ्यास दे वस्त्र रेशीमकांठी । कधी लागते काठि घेऊनि पाठी १४ नसे मूल पोटीं तई शुद्ध लाडा । प्रसूती घडे सूकराचाचि वाडा ॥ कधीं जेविते साखरेशी तुपाशीं । कधी पाणिहि घोटिना ती उपाशी १६५ मनी ठेवितां रक्तमांसासि जाळी । हिरावूनि घे वीर्यही स्पर्शकाळी ॥ क्षणाच्या सुखाच्या मिषानेंच मोहीं। अहा घालिते जन्म हा दुःखडोही १६ करी नेम तैं वाहिली जेवि आण । क्षणी मोडि शब्दास नाही ठिकाण ॥ क्षणामाजि मागेंच टाकी सतीतें । क्षणी कोपुनी लाथ मारी पतीतें ॥१७॥ न राहे मुखीं एकही गुप्त गोष्ट । कथाया जगाला सदा सिद्ध ओष्ठ ॥ नसे ठाउकें प्रेम खाती कशाशीं। सदा सर्वदा लोभ ठेवी उशाशी ॥१८॥ स्त्रियेच्यामुळे तूटती मायबाप । स्त्रियेच्यामुळे थोर संसारताप ॥ स्त्रियेच्यामुळे होतसे घोर पाप । स्त्रियेच्यामुळे काळजीचाही चाप ॥१९॥ नको ह्या स्त्रिया लांकडी मृत्तिकेच्या । सदा लाविती पाठिमागें भिकेच्या ॥ तयांच्या सुखाचा दिसे मात्र मास । परी शेवटीं खास ये नर्कवास ॥२०॥ लोकोत्तर चमत्कार. मृताच्या डोळ्यांत खुनी! आलीकडच्या नव्या नव्या व अद्भत शोधावरून मनुष्यप्राणा हा