या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २४९ आपले ज्ञान कोठपर्यंत वाढवील, कोणकोणती लोकोत्तर कार्य करील, व ईश्वरकृतीच्या किती जवळ जवळ जाईल, ह्याचा काही नेम सांगवत नाही, असे वाढू लागले आहे. परमेश्वर पदार्थमात्रांत नाहीं नाहीं ते गुणधर्म ठेवणारा भला, आणि मनुष्य ते त्याचे गुप्त भांडवल बाहेर काढणारा भला, असे होऊन गेले आहे. मनुष्याची कोणतीही कृति ध्या; ती ईश्वरी कृतीची नक्कलच असते. फोटोग्राफी ही एक ईश्वराने केलेल्या प्राण्यांच्या डोळ्यांतील कार्याची नक्कल आहे. हेही शास्त्रज्ञ लोकांस नवीन सांगावयास पाहिजे असे नाही. ह्या फोटोग्राफीच्या कलेमध्येही काही कमी चमत्कार आहेत असे नाही, पण ते बहुतेक सर्वविश्रुतच असल्यामुळे त्याबद्दल आज येथे विचार करावयाचा नाही. तर आलीकडे असा एक शोध लागला आहे की, मेलेल्या मनुष्याच्या डोळ्यापुढे त्याचा प्राण जातांना जे जे पदार्थ असतात, त्याचे अतिशय सूक्ष्म प्रतिबिंब उठलेले असते; व तें तेथें बरच वेळ कायम राहते. ह्याकरितां त्याच्या त्या डोळ्याचा लागलीया लागलाच फोटो घेऊन त्यांतील प्रतिमा वाढविण्याच्या यंत्राने प्रतिमा वाढवीत वाढवीत गेले, तर ते पदार्थ स्पष्ट दिसतात, येवढेच नव्हे, तर खुनी मनुष्य प्राण जातांना जवळ असेल, तर त्याचीही तसबीर त्यांत उठते! ह्या अपूर्व शोधाचा इतिहास मोठा चमत्कारिक आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये एका फोटोग्राफरची फारच कीर्ति पसरली होती. ती अशी की, कोणी एक डाक्टर मेलेल्या मनुष्याच्या डोळ्यांचा फोटो घेतो, आणि त्यावरून मृत मनुष्य मरण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांसमोर कोण मनुष्य होता हे सांगू शकतो, किंवा त्याची प्रतिमा तयार करतो. पुढे पुढे तर हा डाक्टर इतक्या प्रसिद्धीस आला की, खुनाच्या खटल्यांत तो खुनी मनुष्यांचा फोटो घेऊन त्यांत पडलेलें खून करणाऱ्याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब न्यायाधीशास काढून देऊ लागला. ह्या डाक्टरचें नांव स्पांडफर्ड असें होतें. ह्याने ऑवबोन येथे बेर्डस्ले ह्या नांवाच्या मनुष्याचा खून झाला होता, त्याच्या एका डोळ्याचा फोटो घेऊन त्यांत असलेली प्रतिमा इंलार्ज करून वाढविली. तेव्हां त्या खून करणाराचा सफेत कोट ३२