या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. दिसू लागला, व त्याच्या जवळ किंवा अधांतरी एक वाटोळा दगड असल्याचे स्पष्ट दिसू लागले. असें ही सांगतात की, इ. स. १८६० पूर्वी चिकागोमध्ये पोलॉक ह्मणून एक डाक्टर होता, त्याने हेच प्रयोगकरून पाहिले होते, व त्यांतही त्यास उत्तम यश आले होते. परंतु वैद्यकीय मासिकपुस्तकांतून वगैरे अशा प्रकारचे काढलेले फोटो किंवा मरतांना पुढे असलेल्या मनुष्याची प्रतिमा डोळ्यांत कायम असते ही कल्पनाही कधी पुढे आलेली नाही. परंतु आलीकडे थोड्या वर्षांत नेत्रांतील रिटानीआ नामक पडद्याच्या रंगासंबंधानें पुष्कळच चमत्कारिक माहिती बॉल आणि खुन्ने ह्या गृहस्थांनी प्रसिद्ध केली आहे. रिटानिआ हा पडदा बुबुळाच्या अंतर्भागांत असतो, आणि त्याची जाडी १ इंचाहून अधिक नसते. डोळ्यांतून येणारा प्रकाश ह्या पडद्यावर पडत असतो. फोटोग्राफरच्या क्यामेयावर जसें बाह्य पदार्थांचे प्रतिबिंब उठते, त्याचप्रमाणे ह्या पद्धद्यावरही बाह्यपदार्थांचे प्रतिबिंब उठतें. डाक्टर बॉल हा इटालियन प्रोफेसर असून तो तरुण वयाव इ. स. १८७७ मध्ये मरण पावला. त्याने असें निश्चित केले की, रिटानियाच्या खालचा थर जांबळसर तांबडा असतो. आणि त्याचे असेंही मत होते की, डोळ्यांमध्ये जो प्रकाश शिरतो, त्याच्या योगानें मनुष्य जिवंत असतांना त्याचा रंग कमी कमी होत जातो, व तो अंधारांत परत येतो. आणि मृत्यु आल्यानंतर फारच थोडा वेळ तो राहतो. ह्या बॉलच्या ह्मणण्याप्रमाणे हेडलबर्ग येथील डाक्टर डब्ल्यू. खुन्ने ह्याने अनेक प्रयोग करून पाहिले. आणि त्यावरून त्याची अशी खात्री झाली की, रिटनिआचा जांभळा रंग असतो तो, मृत्यूनंतर कांहीं अधिक कालपर्यंत कायम राखतां येईल. आणि नंतर त्यास प्रकाश दाखविला तरच तो नाहींसा होईल. ह्या अनुमानावरून फोटोग्राफीचे किंवा डोळ्यांच्या फोटोग्राफीचे अनेक प्रयोग करून पाहिले. आंधारामध्ये अनेक प्राणी मारले. आणि त्यांस तसंच कांही वेळ आंधारांत ठेवून नंतर त्यांचे डोळे काढले. आणि एका आंधारकोठडीमध्ये एकाच खिडकीतून आलेले ऊन त्यावर पाडत तेव्हां त्या रिटानिआवर त्या खिडकीचे प्रतिबिंब उठले. तीस प्र