या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २५१ योगांत एकच प्रयोग चुकला. ह्मणजे त्यावर प्रतिबिंब उठलें नाहीं. पण त्याचे कारण त्यावर म्याग्निशिमच्या दिव्याचा प्रकाश पंधरा सेकंदांहूनही अधिक वेळ दाखविलेला होता. ह्यानंतर त्याने ते डोळे एका भांड्यांत घालून त्याचेही अनेक प्रयोग करून पाहिले. ते त्याचे प्रयोग कसे होते ते कळण्यासाठी त्याची थोडीशी माहिती खाली देतोंः एक ससा एका आंधारकोठडीत ठेवून त्याचा उजवा डोळा फाडून मोकळा केला. आणि त्या आंधारकोठडीला बरोबर चौकोनी खिडकी करून ठेवली होती ती उघडली. आणि तीन मिनिटेंपर्यंत तिच्यांतून येणारा प्रकाश त्या डोळ्यावर पाडला. नंतर त्या सशाचें मस्तक कापून त्यांतील तें बुबूळ काढून घेतले. नंतर प्रतिमा व्यक्त होणाऱ्या अशा काही रसायनामध्ये काही तास ठेवल्यानंतर तो डोळा फाडला, आणि रिटानिआचा पडदा जपून वेगळा केला. तेव्हां त्या स्वछ गुलाबी व जांबळसर अशा सुंदर त्वचेवर चौकोनी पांढरी सफेत ॐ प्रतिमा अतिशय स्पष्ट दिसू लागली. हाच डोळ्यांच्या फोटोग्राफीतील उत्तम साधलेला प्रयोग होय. हा रिटानिआवरील चौकोन ह्मणजे अर्थात् त्या खिडकीचे प्रतिबिंब होय. पण ह्यांत एक ध्यानांत ठेवले पाहिजे की, अशा कामी त्यावर स्वच्छ किंवा तीव्र प्रकाश पडावा लागतो. आणि तो पडल्यानंतर लगेच डोळा काढावा लागतो. उशीर होता कामा नये. नाही तर तो पडद्याचा जांभळा रंग नाहींसा होण्याचे भय असते. आमी वर सांगितलेल्या वीस वर्षांतील प्रयोगांच्या अनुभवावरून ही एक गोष्ट उत्तमरीतीने सिद्ध झाली आहे की, खुनाच्या खटल्यांत मयत मनुष्याच्या डोळ्यांत मरणाआधी पडलेलें खुनी मनुष्याचे प्रतिबिंब ह्या कुशल व शास्त्रीय प्रयोगाशिवाय बाहेर पडणे केवळ अशक्य होते. व त्याप्रमाणे बऱ्याच खटल्यांत ह्या प्रयोगाचा उपयोगही झाला, ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. म्यांचेस्टर येथे ७८ वर्षांपूर्वी एका मुलीचा खून झाला, व त्या खून करणाराचा पत्ता लागण्याचा मुळी संभव सुद्धा नव्हता. परंतु एका डाक्टराने ह्या नेत्रफोटोग्राफीच्या साधनाने तिचा खून करणारा पोलिसचा शिपायी ह्याची तसबीर काढून दिली.