या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. त्याची टोपी स्वच्छ उठलेली असून तिजवरचा १७ नंबर ठळक दिसत होता. त्यावरून त्या खुनी मनुष्यास सहज पकडतां आलें. आतां असा प्रकार नसेल-ह्मणजे प्रकाश जसा पडावा तसा पडलेला नसेल, तो डोळा, मनुष्य मेल्यानंतर फार वेळ प्रकाशांतच राहील, तर हा प्रयोग फसण्याचा संभव आहे हे उघडच आहे. पण तशी संधि साधल्यास मात्र ती फुकट जाणार नाही. ह्या नवीन कलेचा शोध लावणारे प्रसिद्ध डाक्टर खुन्ने ह्यानी ह्याच विषयांवर जे फोटोग्राफर लोक अनेक वर्षे खटपट करित असतील, त्यांना असे सांगून ठेवले आहे की, "माझ्या शोधाचें जितकें स्पष्टीकरण करावयास पाहिजे होते तितकें मीं केलेले नाही. कारण, ह्या नव्या युक्तीचा शोधक मीच असे समजून हिकडचे ह्मणा, की द्वीपांतरचे ह्मणा, शोधक लोक मृतमनुष्याच्या डोळ्यांतील प्रतिमा पाहिल्या वर माझ्या श्रमाचे पहिले बक्षिस खमाटण्यासही कमी करणार नाहीत, खरोखर ह्या कलेचा अभ्यास करणे ह्मणजे कांहीं मजा मारणे नव्हे, किंवा पोरचेष्टाही नव्हे, तर ती अत्यंत कष्टसाध्य गोष्ट आहे." थोडासा विचार करून पाहिले झणजे डोळ्याच्या फोटोग्राफीतील प्रयोगापासून होणारे चमत्कार सामान्य नाहीत, असे दिसून येईल. लेन्सक्यामेयांतील रसायनाच्या कांचा, कलोडियन, अयोडाइझ, नाइट्रेट ऑफ सिल्व्हर इत्यादि औषधे लावून तयार करण्यास अतानात कष्ट सोसावे लागतात. पण डोळ्यांतील 'रिटानिआ' हा प. डदा परमेश्वराने आयतीच रसायन लावून ठेवलेली कांच-सन्सिाट०६ प्लेट-आहे. आणि तिला फोटोग्राफीप्रमाणे 'डिव्हेलपिंग' वगैर क्रिया करण्याची सुद्धां आवश्यकता नाही. डोळ्यांतील इतर भाग तो क्यामेरा होय. आणि रिटानिआ हा त्याचा लेन्स. त्यावर समान रच्या पदार्थाचे प्रतिबिंब इतके ठळक व सहज पडतें की, ते त्या प्राण्यास समजत सुद्धा नाही,