या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. वनस्पतींचा संसार. मुक्काम दुसरा. वनस्पति प्रथमतः कशा उत्पन्न झाल्या? पहिल्या प्रथम कोण उत्पन्न झाले? प्राणी का वनस्पति ? हा प्रश्न विचारणे झणजे बहुतेक अंशी आधी सावनें उत्पन्न झाली की आधीं हिंस्र पशु उत्पन्न झाले ? असे विचारण्यासारखेच आहे. तर लहान लहान जनावरें उत्पन्न झाल्यावांचून सिंह आणि वाघ उत्पन्न झाले नाहीत हे अगदी उघड आहे. कारण हरणे, ससे, गाई इत्यादि जनावरें धरून खावयास असल्याशिवाय सिंह आणि वाघ वांचणेच शक्य नाही. हा प्राण्यांतील आणि वनस्पतींतील संबंध काही अंशी सावर्ज आणि हिंस्र पशु ह्यांमधील संबंधाप्रमाणेच आहे. कारण, प्रत्यक्ष किंवा परंपरया वनस्पति आणि तज्जन्य भाग ह्यांच्या वरच सर्व पशुंचा सरितार्थ चालतो. मांसभक्षक पशू, मेंढरे आणि ससे खातात असे मटले तरी, ससे व मेंढरें तरी गवत आणि झाडपालाच खाऊन जगतात. पण वनस्पतींची गोष्ट तशी नाही. त्या स्वतःच्याच आश्रयावर उपजीवन करणाऱ्या आहेत. वनस्पति आपल्या निर्वाहाकरितां ह्मणून जे काय ठेवतात, त्यावरच पशू निर्वाह करतात. प्रत्येक प्राणी आपलीं घटक द्रव्ये (पाणी खेरीजकरून) प्रत्यक्षतः किंवा परंपरया वनस्पतीपासूनच संपादन करतो. ह्या सर्वांचा मथितार्थ हा की, जीवघटकद्रव्ये कशी तयार करावीत हे फक्त वनस्पतींनाच माहित आहे. स्पष्ट बोलावयाचे तर इतकेंच की, वनस्पति ह्या मिळवित्या आहेत, आणि प्राणी हे खाऊन फडशा पाडणारे आहेत. वडापिंपळासारखी झाडे लांकूड तयार करतात, आणि प्राणी हे विस्तवाप्रमाणे त्यांस जाळून त्यांचा फडशा पाडतात, आणि त्यांना पुन्हा पूर्वीच्या निरिंद्रिय स्थितीला पोचवितात. 2 थोडेसें विचारांत डोके घातल्याशिवाय, प्राण्यांमधील आणि वनस्पतीमधील खरा संबंध काय आहे ते कळण्याला बरेंच जड जाते. तथापि