या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ केरळकोकिळ, पुस्तक १५वे. तो इतका महत्वाचा, व आमच्या पुढील विवेचनास इतका उपयोगी आहे की, आधी आह्मींच तो सांगून टाकून आपणास तो विचार करणे भाग पाडतो. आपण एक कोळशाचा किंवा लांकडाचा तुकडा घेतला, तर त्यामध्ये कांहीं हैड्रोजन असतो व कांहीं कारबान असतो. पण तो फार करून आक्सिजनाशी मिश्र झालेला नसतो. किंवा मिश्रित असलाच तर तो इतका थोडा असतो की, त्यांचा एकत्र राहण्याचा धर्म न मोडेल. आतां ह्या कोळशाला किंवा लांकडाला पेटवावें ह्मणजे काय होईल ? ती पेटतील आणि नाहींशी होईपर्यंत जळत राहतील, हेच आह्मी त्याचे उत्तर देणार. परंतु ती जळण्याचे कारण काय ? त्याचे कारण, कारवान आणि हैड्रोजन हे दोघेही आक्सिजनला झपाट्याने मिळत असतात. ते सारा आक्सिजन काढून घेऊन त्यांत मिसळतात, आणि त्याला कार्यानिक आसिड व पाणी ह्याचे स्वरूप देतात. कारबान हा आक्सिजनशीं अगदी एकरूप होऊन त्याचे काबानिक आसिड होते, आणि तें धुराड्यांतन निघन वातावरणाशी मिश्र हो हैड्रोजनही आक्सिजनला तितक्याच प्रमाणाने मिळतो. आणि तो आक्सिजनशी एकरूप होऊन वाफेच्या किंवा जलमय वाफेच्या रूपानं वातावरणांत मिश्र होतो. ह्मणून जळणे ह्याचा खरा अर्थ, लांकडांतील किंवा कोळशांतील कारबान आणि हैड्रोजन ह्यांचे वातावरणांतील आक्सिजनशीं मिलाफ होणे, ह्याहून अधिक काही नाहा. परंतु कारबान आणि हैड्रोजन जळतांना ते उष्णता व प्रकाश दत असलेले दृष्टीस पडतात. हा प्रकाश आणि ही उष्णता त्यानी आप. आपल्या स्वरूपांत आधीच सांठवून ठेवलेली असते. ह्मणजे ती त्याच्या मध्ये गुप्त किंवा मुग्ध स्थितीत असते असें ह्मणावयाचे. शुद्ध कारबान आणि शुद्ध हैड्रोजन ह्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ति आहे. तिलाच गुप्त-अप्रगट-प्रकाश किंवा गुप्त उष्णता असें ह्मणतात. मात्र ते आक्सिजनशी मिळतांना ती बाहेर प्रगट करतात. त्यामुळ लाक डांतील व कोळशांतील कारबान व हैडोजन ते जरी अगदी प्रगट नसतात तरी-ते त्या वेळी आपल्या ह्या कार्यापुरते चांगले व्यक्त होऊन बाहेर पडतात. आतां हा प्रकाश आणि ही उष्णता येते कोठून? लाकूड हा