या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १९०१. २६६ झाडाचा एक भाग असून तो उघड्या हवेत सूर्यप्रकाशाने वाढतो हैं आपणांस पकें माहित आहे. त्याचप्रमाणे दगडी कोळसा हाही युगोंतरीच्या एका प्रकारच्या झाडांचा एक भाग आहे. तो अनंत काल पृथ्वीमध्ये दडपून जाऊन कठीण झालेला असतो. ह्यामुळे त्याच्यांत सुद्धां वनस्पतिजन्य लांकडाप्रमाणेच दाह्य धर्म शिल्लक असतो, आणि तोही पेटवितांच पेट्रू लागतो. ह्या दोहोंतही प्रकाश आणि उष्णता ( पुढे अधिक विवेचन केले आहे. ) आमच्या जीवनशक्तीचें अनंत भांडार जो सूर्य, त्याच्याच पासून त्यास प्राप्त होतात. ज्यांचा दगडी कोळसा बनतो, अशा जुन्या ओकांच्या वृक्षांच्या पानावर किंवा फार जुनाट शेवाळीच्या ढिगावर सूर्यप्रकाश पडतो, आणि कार्बोनिक आसिडांतील आक्सिजनपासून आक्सिजन व चिकांतील पाण्यांतील आक्सिजनपासून हैड्रोजन वेगळा करतो. ह्या प्रत्येक कृत्यांत आक्सिजन हा शुद्ध स्वरूपाने हवेशी मिश्र होत असतो. आणि कारबान व हैड्रोजन (काही थोड्याशा इतर द्रव्याशी संयुक्त थोडासा आक्सिजन) बहुतेक शुद्ध खरूपांत ओक वृक्षाच्या किंवा शेवाळीच्या लाकडांत किंवा पानांत शिल्लक राहतो. परंतु ज्या विशेष गोष्टीकडे मी आपले लक्ष्य वळविणार आहे, ती गोष्ट ही की, सूर्यप्रकाशाच्या योगाने एकीकडून आक्सिजन आणि दुसरीकडून कारबान व हैड्रोजन हे निरनिराळे करण्याचे काम चालू असतें. आणि झाड जोपर्यंत न जळतां शिल्लक असते, तोपर्यंत तें सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता ग्रहण करून ती गुप्त रीतीने आपणामध्ये सांठवन ठेवित असते. ती उष्णता व प्रकाश प्रत्यक्षच नसतात. आक्सिजन आणि हैड्रोजन किंवा कारवान ह्यापासून वेगवेगळी अशी असतात. दगडी कोळशाची यथातथ्यच व्याख्या करावयाची तर ती "सूर्यप्रकाशाची भरलेली बरणी" अशी होईल. पण ह्याहूनही चमत्काराची गोष्ट ही की, झाडे आपल्यास करावयाला सूर्यापासून जितका प्रकाश आणि जितकी उष्णता ग्रहण करतात, तितकी सरतेशेवटी आपणांस ते लाकूड जाळून अखेरीस ब्बाहेर काढतां येते. आतां आपण एखादा लांकडाचा किंवा दगडी कोळशाचा तुकडा घेऊन जाळू या. तर काय होते? जळण्यामध्ये