या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ . केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. आक्सिनजचे आणि कारखानचे असलेले परमाणू एकांत एक शिरतात आणि त्यापासून कारबानिक आसिड तयार होते. पण किती कारवानिक आसिड तयार होतें ? तर त्या झाडाचा आकार तयार व्हावयाला मूळ जितकें लागले असेल तितकें. आणि त्याच वेळी आक्सिजनचे दुसरे परमाणू त्या जळणामध्ये असलेल्या हैडोजनच्या परमाणूंमध्ये घुसून वाफेच्या स्वरूपाने पाणी तयार करित असतात. हे पाणी किती होते? त्या झाडाचा तो भाग तयार होण्याला पूर्वी लागले असेल तेवढे. हे सर्व एकत्र मिळाले की, ते आपली गप्त उष्णता व प्रकाश बाहेर टाकतात. किती प्रकाश व किती उष्णता बाहेर टाकतात? त्या झाडाचे ते भाग तयार होण्याच्या क्रियेमध्ये त्यांच्यावर सूर्यकिरण पडले असतां, त्यांच्या पासून जितकी शोषन घेतात, तितकी. ह्मणजे जळण्याच्या क्रियेमध्ये त्यांच्याशी कारखान आणि हैड्रोजन संयुक्त झाल्यापासून जितका आक्सिजन प्रथमतः निराळा निघालेला असतो तितका पुन्हा एकत्र होतो. आणि त्या पृथक्करण करण्यास जितकी उष्णता व प्रकाश लागतो, तितकाच पुन्हा संयुक्त होण्याच्या क्रियेपासून उत्पन्न होतो. आतां हाच मुद्दा संख्यांकाने दाखवून देऊन स्पष्ट करतों, मणजे आमचें ह्मणणे नीट रीतीने ध्यानात येईल. समजा, की आपण हिरव्या पानाच्या आतील कारबानिक आसिडच्या एका परमाणूपासून व पाण्याच्या एका परमाणूपासूनच आरंभ करावयाला लागलो. मुळांनी रसरूपाने जे पाणी आणलेले असते, तें कार्बोनिक आसिड पानाच्या द्वारें हवेतून खाऊन टाकतें. आतां सूर्याच्या प्रकाशाच्या शक्तीने ही द्रव्ये त्यांच्या घटक द्रव्यांपासून वेगवेगळी होतात. कारबानिक आसिडच्या अंशामध्ये कारबानचा एक परमाणू असतो, आणि तो आक्सिजनच्या दोन परमाणूंनी अगदी बंद केलेला असतो. तो ह्यांतून सुटून परमाणू मोकळे करण्याला काही प्रमाणाने सूर्य प्रकाश ग्रहण करतो, ते प्रमाण आपण 'अ' असें मानूं. आक्सिजन सपाट्याने हवेत जात असतो. आणि कारबान हा वनस्पतीच्या वाढीचे द्रव्य असल्यामुळे तो पानामध्येच शिल्लक राहतो. तसेच पाण्याच्या अंशमध्ये हैड्रोजनचे दोन परमाणु आक्सिजनच्या एका परमाणूबरोबर